करकंब पोलिसांची एकाच दिवशी चार हातभट्टी दारू विक्रेत्यांवर कारवाई

करकंब पोलिसांची एकाच दिवशी चार हातभट्टी दारू विक्रेत्यांवर कारवाई

अवैध दारू विक्रीबाबत माहिती देण्यासाठी नागिरकांनी पुढे यावे- स.पो.नि.प्रशांत पाटील

पंढरपूर तालुक्यातील करकंब पोलीस ठाण्यांतर्गत असेलेल्या भोसे,उंबरे यासह करकंब येथे दोन ठिकाणी अवैधरित्या हातभट्टी दारू विक्रेत्यांवर एकाच दिवशी कारवाई केली आहे.गेल्या पाच महिन्याच्या कालावधीत करकंब पोलीस ठाण्याअंतर्गत विविध गावातील अवैध दारू विक्रेत्यांवर सातत्यपूर्ण व सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या असून नागिरकांनी आपल्या परिसरात अवैध दारू विक्रीचा प्रकार आढळून आल्यास थेट संपर्क करावा असे आवाहन करकंब पोलीस ठाण्याचे स.पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील यांनी केले आहे.
    करकंब पोलिसांनी सोमवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी भोसे ते शेवते रस्त्यावर धनाजी उर्फ बंडु वसंत तळेकर हा त्यांचे राहते घराचे पाठीमागे पांढरे रंगाचे प्लँस्टिकचे कँन्ड घेवुन हातभट्टी दारूची विक्री करताना आढळून होता.तर करकंब ते जाधववाडी रोडवर तळयासमोरील पत्र्याच्या शेडच्या पाठीमागे एक इसम बसलेला अवैध दारु विक्री होत असल्याची माहीती मिळाली असता करण्यात आलेल्या कारवाईत १५ लिटरचे कॅण्डमधून राजु अनंत धोत्रे वय – 35 वर्षे रा.करकंब हा इसम हातभट्टी  विक्री करत आल्याचे दिसून आले.तसेच  करकंब गावातील इसम नामे अविनाश बंडू शिंदे हा राजा पंढरीचा व्यापारी संकूल च्या पाठीमागे चिलारीचे झुडपात चोरुन दारुची विक्री करीत आहे. अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने करण्यात आलेल्या कारवाईत पांढऱ्या रंगाच्या पिशवीतून अविनाश बंडू शिंदे वय 25वर्षे रा. धाकटी वेश करकंब हा अवैध दारू करीत असल्याचे दिसून आले.तर उंबरे येथील अंबादास हरिसिंग रजपुत हा इसम प्लास्टिक कॅन्डमध्ये हातभट्टी विक्री करता घेऊन बसल्याचे आढळून आले.
       वरील सर्व आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ ई नुसार करकंब पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.स.पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या विविध ठिकाणच्या या कारवायांमध्ये पो.ना.शेटे, पोहेकाँ 247 हरिहर, पोना/1746 गिरमकर , पोकाँ/ 26 भोसले, पोकाँ/ 1510 रमेश फुगे, पोहेकाँ/02रानगट, पोना/1696 कोऴवले, पोना/175खांडेकर, पोना/134 पाटेकर, पोना 526जाडकर, पोना 369 गव्हाणे,पो.कॉ. /ब.नं. 26 भोसले, पोना/518 डी बी सुळ व पोना/1897 आर आर जाधव यांनी या कारवाईत सहभाग घेतला.   

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

1 week ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago