एकलासपूर येथील पीठ गिरणी चालकाला लाचेची मागणी महावितरणचा कंत्राटी वायरमन एसीबीच्या जाळ्यात

एकलासपूर येथील पीठ गिरणी चालकाला लाचेची मागणी 

महावितरणचा कंत्राटी वायरमन एसीबीच्या जाळ्यात 

आकडा टाकून वीज वापरत असल्याचे तपासणी वेळी उघड झाल्यानंतर कारवाई टाळण्यासाठी एकलासपूर तालुका पंढरपूर येथील पीठ गिरणी चालक आकाश ताड याच्याकडे  ६ हजाराच्या लाचेची मागणी करणारा कंत्राटी वायरमन पांडुरंग अनिल दांडगे, वय 26वर्षे, कंत्राटी तंत्रज्ञ/वायरमन, रा. कोंढारकी ता. पंढरपुर हा लाच लुचपत विभागाच्या सापळ्यात रंगेहाथ सापडला असून या घटनेमुळे महावितरण मधील लाचखोरी पुन्हा चर्चेत आली आहे.
या बाबत दाखल फिर्यादीनुसार सविस्तर वृत्त असे कि, ११ ऑगस्ट २०२० रोजी सदर प्रकरणातील आरोपी वायरमन दांडगे हे फिर्यादीच्या एकलासपूर येथील पिठाच्या गिरणीच्या ठिकाणी तपासणी साठी गेले असता त्यांना सदर फिर्यादी याने आकडा टाकून वीज घेतल्यास निदर्शनास आले.या वेळी वायरमन दांडगे यांनी फोटो काढला व कारवाई करण्यात येईल असे सांगितले. दांडगे वायरमन हे फिर्यादीकडे आले व केस न करण्यासाठी म्हणुन 8,000/-रु. मडमना देण्यासाठी दया अशी मागणी केली. यावेळी फिर्यादीने जवळ रोख असलेली रक्कम 1,500/-रु. दिले व वडीलांचा मो.नं. 9881589851 वरुन वायरमन दांडगे यांचे मो.नं. 8975574772 वर गुगल पे द्वारे 500/-रु. पाठउन दिले होते.नंतर काही दिवसानंतर वायरमन दांडगे हे फिर्यादीला भेटले व उर्वरीत 6,000/-रु. ची मागणी केली.दि. 20/08/2020 रोजी 13.50 ते 15.50 या दरम्यान पांडुरंग अनिल दांडगे यांनी उर्वरीत 6,000/-रु. लाच मागणी अनवली गावातील तळयाजवळ करुन, ती लाच रक्कम प्रेमाचा चहा कँटीन, सावरकर चौक, पंढरपुर येथे स्विकारुन सांपत्तीक फायदा मिऴवुन गुन्हेगारी स्वरुपाचे वर्तन केले आहे, म्हणुन फिर्यादी आकाश सुभाष ताड यांनी पांडुरंग अनिल दांडगे, वय 26वर्षे, कंत्राटी तंत्रज्ञ/वायरमन, रा. कोंढारकी ता. पंढरपुर जि.सोलापुर यांचेविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये फिर्याद दाखल केली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

4 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

3 weeks ago