६५ एकर परिसरात तात्पुरते कोविड -१९ हॉस्पिटल उभारण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने निर्णय घ्यावा – समाधान आवताडे

६५ एकर परिसरात तात्पुरते कोविड -१९ हॉस्पिटल उभारण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने निर्णय घ्यावा – समाधान आवताडे 

रुग्णसंख्या वाढण्यापूर्वीच उपायोजना गरजेची 

सोलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत जात असताना आता कोरोनाने सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीणभागातही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.पाच दिवसापूर्वी पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर या रुग्णास जनकल्याण दाखल करण्याचा प्रयत्न केला असता या परिसरात अनेक हॉस्पिटल्स,ब्लड बँक आणि दाट रहिवाशी लोकवस्तीचा परिसर असल्याने विरोध झाला.त्यानंतर प्रशासनाने उपजिल्हा रुग्णालयातच कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्याचा निर्णय घेतला पण एकीकडे अनेक खाजगी दवाखाने बंद असल्याने शहर व ग्रामीण भागातील इतर आजार,अपघात याचा सामना करावा लागणाऱ्या सर्वसामान्य वर्गातील रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय हा सक्षम पर्याय उरलेला असताना या ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांना दाखल करणे चुकीचे ठरेल असा समर्पक दावा करण्यात येऊ लागला व या परिसरातील नागिरकांचाही यास विरोध होऊ लागला आहे.अशातच पंढरपूर शहर तालुक्यात काल ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या आणि होणारी गैरसोय लक्षात घेता पंढरपूरचे प्रांताधिकारी,नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक यांनी समन्वयाने निर्णय घेत ६५ एकर परिसरात कोरोना बाधित रुग्णांसाठी प्राथमिक स्वरूपात दाखल करण्याची व उपचाराची सोय करण्यासाठी व्यवस्था निर्माण करावी अशी प्रतिक्रिया दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी पंढरी वार्ताशी बोलताना व्यक्त  केली आहे.        

         या बाबत बोलताना समाधान आवताडे म्हणाले कि,एखादा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्यास तातडीने आयसीयू आणि व्हेंटिलेटरवर ठेवण्याची आवश्यकता नसते हे विविध कोविड हॉस्पिटलच्या ठिकाणची उपचारः प्रणाली पाहता आढळून येत आहे.बहुतांश पॉझिटिव्ह रुग्णांना तर कुठलेही लक्षणे देखील आढळून आली नव्हते तर मधुमेह,हृद्यरोग,दमा,ब्लडप्रेशर आदी विकार असलेले वृद्ध हे सिरीयस होताना दिसून येत आहेत पण यावरही मात करून बरेही होत आहेत.पंढरपुरात काल आढळून आलेल्या रुग्णांनाही किरकोळ सर्दी वगळता कुठलाही गंभीर स्वरूपाचा त्रास होत नव्हता असे सांगण्यात येत आहे.त्यामुळे असे प्रतिकार शक्ती चांगली असलेले रुग्ण काही दिवसातच ठणठणीत बरे होत आहेत.त्यामुळे ६५ एकर परिसरात तात्पुरत्या स्वरूपात कोविड रुग्णालय उभारले तर या ठिकाणी कमी लक्षणे असलेल्या अथवा त्रास नसलेल्या  पण कोरोना पॉजिटीव्ह रिपोर्ट आलेल्या रुग्णांना नियमित उपचारासाठी ठेवता येणे शक्य आहे.पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले,नगर पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर आणि उपविभागीय पोलीस  अधिकारी डॉ.सागर कवडे हे अतिशय समन्वयाने आणि दक्षतेने उपायोजना करीत असताना पंढरपूर शहर व तालुक्यात आढळलेल्या कोरोना रुग्णाची सोय पंढरपूर परिसरात होणे गरजेचे आहे हे ओळखून सुजाण नागिरकांनी यासाठी आग्रह धरला पाहिजे आणि या गंभीर प्रकरणात राजकारण नाही झाले पाहिजे अशीच प्रतिक्रिया दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी पंढरी वार्ताशी बोलताना व्यक्त  केली आहे

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

7 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

1 week ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

3 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

3 weeks ago