पंढरपूर शहर तालुक्यात आढळले ५ कोरोना पॉझिटिव्ह !

पंढरपूर शहर तालुक्यात आढळले ५ कोरोना पॉझिटिव्ह ! 

प्रांताधिकारी सचिन ढोले आणि न.पा.मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर यांनी थोपवले पंढरपुरावरील महासंकट !

देशभरात कोरोनाचा वेगाने संसर्ग होत असताना व या महाराष्ट्रातील मुबई-पुणे-औरंगाबाद-सोलापूर सारखी महानगरात दररोज मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या आढळून येत असताना पंढरपूर मात्र यापासून दूर होते.जगतनियंता पांडुरंगाचे आभार मानत पंढरपूरकर रोज सुटकेचा निश्वास सोडत असतानाच चारच दिवसापूर्वी उपरी तालुका पंढरपूर येथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला.त्यामुळे पंढरपुरांचे टेन्शन वाढले.होते. उपरी येथील सदर व्यक्ती हा पंढरपूर तालुक्यात दाखल होताच संस्थात्मक विलगीरकन करण्यात आला होता.मात्र सदर व्यक्ती  हा पंढरपुरात फेरफटका मारून गेला आहे अशा अफवा काही मूर्खांनी पसरवल्या होत्या त्यामुळे पंढरपूरकर धास्तावले होते.पण हा प्रकार खोटा होता.मात्र आज अखेर पंढरपूर शहरातील मूलनिवासी असलेले २ व्यक्ती हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून हे दोन्ही व्यक्ती शहरातील अतिशय दाट लोकवस्ती असलेल्या ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी परिसरातील आहेत.तर एक व्यक्ती हा उपरी,एक  गोपाळपूर येथील तर एक करकंब येथील आहे.   

             आज पंढरपूर शहरातील दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या दोन्ही व्यक्ती महानगरातून पंढरपुरात आलेल्या होत्या आणि त्यांचा  होम कोरेंटाईनचा आग्रह होता मात्र त्यास दाद न देता प्रांताधिकारी सचिन ढोले आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर यांनी संस्थात्मक कोरेंटाईनचा  आग्रह धरत संबंधित ठिकाणी पाठवले.  

        यापैकी एक पॉझिटिव्ह रुग्णास सुरुवातीस कुठलेही लक्षणे आढळून येत नव्हती.पुढे त्यास सर्दीचा त्रास होऊ लागला इतकेच.पण रिस्क नको म्हणून चाचणी घेण्यात आली आणि सदर व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली.विशेष म्हणजे याचा संस्थात्मक विलगीकरणाचा कालावधी दोनच दिवसात संपुष्ठात येणार होता आणि त्या नंतर शहरातील एका दाट लोकवस्तीच्या परिसरातील झोपडपट्टीतील आपल्या घरी ते कुटुंब जाणार होते.  

       वेळीच प्रशासनाने दखल घेतली नसती तर पुढे पंढरपूरकरांवर भीषण संकट ओढवले असते.त्यामुळेच आपण पंढपूरकरकरानी प्रांताधिकारी सचिन ढोले आणि नगर पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

5 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago