तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांविरोधात पंढरपूर शहर पोलिसांची कारवाई

तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांविरोधात पंढरपूर शहर पोलिसांची कारवाई 

कोरोना विषाणूचा प्रसार रोखणेकामी जिल्हाधिकारी सोलापूर यांनी जारी केलेल्या विविध प्रतिबंधात्मक आदेशानुसार जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीस प्रतिबंध करण्यात आलेला असतानाही पंढरपूर शहरात दोन इसम अशा प्रकारच्या पदार्थांची विक्री करीत असल्याचे आढळून आल्याने पंढरपूर शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत गुलजार सलीम तांबोळी (देवळे) व अनिल सुर्यकांत कोंडावाड या दोन इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पो.काँ. राहुल हणमंत लोंढे नेमणुक तपास पथक,उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,पंढरपूर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार कराड नाका वांगीकर नगर येथे गुरूप्रसाद प्रोव्हिजन किराणा व स्टेशनरी दुकानाजवळ दोन इसम पाँलीथीनच्या बॅगा घेवून दिसले. पोलिसांना पाहताच त्यांनी गाडी वळवून गुरूप्रसाद दुकानाजवळून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलसांनी त्यांना ताब्यात घेतले जवळील पाँलिथीन बगा पंचासमक्ष तपासणी केली असता, त्यामध्ये तंबाखुच्या वेगवेगळया कंपनीच्या पुडे व पुडया, विडी, सुट्टी तंबाखु, सिगारेट असे साहीत्य मिळून आले. तसेच स्कुटीच्या समोरील बाजूस असलेल्या फुटरेस्टवर एका खाकी बाँक्समध्ये ब्रिस्टाल व गोल्ड प्लक सिगारेटचे बाँक्स ठेवलेले दिसले. पंचासमक्ष स्कुटीच्या मागे बसलेल्या इसमास नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अनिल सुर्यकांत कोंडावाड वय 45 वर्षे व्यवसाय-व्यापार रा.लिंकरोड, वांगीकर नगर, पंढरपूर जि.सोलापूर असे सांगीतले. तसेच पाँलीथीन बगमध्ये असलेला तंबाखुजन्य पदार्थ त्याचे असल्याचे व विक्री करीता घेवून जात असल्याचे सांगीतले. तसेच स्कुटी चालक गुलजार सलीम तांबोळी वय 34 वर्षे व्यवसाय-किराणा माल विक्रेता(फेरी) रा.नगरपालीका दवाखान्या समोर पंढरपूर जि.सोलापूर असे असल्याचे सांगीतले.
लोकांच्या जिवीतास धोकादायक असलेल्या कोरोना रोगाचा संसर्ग पसरविण्याची कृती करून, मा.जिल्हाधिकारी सो.सोलापूर यांनी बंदी घातलेल्या तंबाखुजन्य मालस्वतःच्या ताब्यात बाळगून विक्री करत असताना मिळून आले आहेत. म्हणून माझी वरील दोघांविरूध्द सरकारतर्फे भारतीय दंड संहीता कलम 269, 188 साथीचे रोग अधिनीयम 1897 कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत पो.हे.कॉ.यलमार, पो.ना.भोसले,पो.ना. रोंगे यांनीही सहभाग घेतला.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

1 day ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 week ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

3 weeks ago