संचार बंदीच्या काळातही शेगाव दुमाला येथून  टिप्परद्वारे वाळू उपसा सुरुच

संचार बंदीच्या काळातही शेगाव दुमाला येथून  टिप्परद्वारे वाळू उपसा सुरुच 

तालुका पोलिसांच्या कारवाईत गंभीर प्रकार उघड 

देशभरात संचार बंदीचा अंमल सुरु असताना व अनेक दुकानदार आपला पोटापाण्याचा व्यवसाय बंद ठेवून घरात निवांत बसलेले असतानाच पंढरपूर तालुक्यात अवैध वाळू उपसा सुरूच असल्याचे पंढरपूर तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघड झाले आहे.या गंभीर प्रकाराची दखल महसूल प्रशासन घेणार का असाच प्रश्न आता सामान्य जनतेमधून व्यक्त केला जात आहे.
    या बाबत पो. कॉ.सोमनाथ नरळे  यांनी  पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादी नुसार दिं.26/03/2020 रोजी रात्री 10/00 वाजण्याचे सुमारास फिर्यादी नरळे व पो.हे.क. क्षिरसागर , पो.हे.क बन्ने , पो. ना.माळी यांना मिळालेल्या माहिती नुसार संजित बंडु शेवाळे रा. गुरसाळे ता. पंढरपुर याने त्याच्या ताब्यातील टाटा कंपनीचे हायवा नं.MH-11-AL -4533 यामधुन शेगावदुमाला हद्दीतील भिमा नदीच्या पात्रातुन वाळु भरुन घेऊन जात आहे .असे खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर तालुका पोलीस मोटार सायकलवरुन मौजे शेगावदुमाला या गावाजवळील यल्लमा देविच्या मंदीराजवळ गेले असता भिमा नदीच्या पात्राकडुन टाटा कंपनीचे हायवा टिपर नं.MH-11-AL -4533 येत असताना दिसला .सदर गाडीचे चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव संजित बंडु शेवाळे रा. गुरसाळे ता. पंढरपुर असे असल्याचे निष्पन्न झाले.सदर टिपर मध्ये ४ ब्रास वाळूची अवैध उपसा करून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.
या कारवाईत )5,00,000/- रुपये किंमचतीचे टाटा कंपनीचे हायवा गाडी MH-11-AL -4533 , 16,000/- रुपये किंमतीचे वरील वाहनाचे हौदात अंदाजे 04 ब्रास वाळु असा एकूण 5,16,000/- जप्त करण्यात आला असून आरोपी संजित बंडु शेवाळे रा. गुरसाळे ता. पंढरपुर याच्या विरोधात भा.द.वि.कलम 379व पर्यावरण कायदा कलम 9 व 15 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

6 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago