कोरोनाच्या पार्शवभूमीवर पंढरीतील उद्योग धंदे थंडावले

कोरोनाच्या पार्शवभूमीवर पंढरीतील उद्योग धंदे थंडावले

पालिकेने सक्तीची करवसुली थांबवावी शहर राष्ट्रवादीची मागणी

कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे राज्यभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.त्यामुळे उद्योग धंद्यावर  मंदीचे सावट आणखी गडद झाले असून व्यवसाय पूर्णतः थंडावले आहेत.एकीकडे मार्च अखेर मुळे व्यापारी,उद्योजक आर्थिक अडचणीत असतानाच पंढरपूर नगर पालिकेने सक्तीने करवसुलीचे धोरण अवलंबले आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये अतिशय नाराजी व्यक्त होत असून नगर पालिकेने हि सक्तीची करवसुली तातडीने थांबवावी अशी मागणी पंढरपूर शहर राष्ट्रवादी कॉग्रेसने नगर पालिका प्रशासनाकडे केली आहे अशी माहिती शहराध्यक्ष सुधीर भोसले यांनी दिली आहे.  

        या बाबत माहिती देताना सुधीर भोसले म्हणाले कि, या बाबत आम्ही प्रांताधिकारी पंढरपूर यांच्या कार्यालयातही निवेदन दिले असून या बाबत तातडीने नगर पालिका प्रशासनाने निर्णय न घेतल्यास राष्ट्रवादी कॉग्रेसच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.हे निवदेन देताना राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष सचिन कदम,राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा माळी,नवनाथ मोरे आदी उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

7 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

1 week ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

3 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

3 weeks ago