पोलीस कोठडीतील कामगारांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पोलीस कोठडीतील कामगारांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल 

आंदोलकांच्या नातेवाईकाविरोधात गुन्हा दाखल

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांसह २४ व्यक्तिविरोधात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण पवार यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून पंढरपूर तालुका पोलिसांनी या दाखल गुन्ह्यातील आरोपीना तातडीने ताब्यात घेण्यास सुरुवात केली असतानाच मंगळवारी यातील काही आरोपी हे पोलीस लॉक अप मध्ये गजाआड केले असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते.त्या मुळे सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटू लागल्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला होता. व अशा प्रकारे साखर कारखान्याच्या कामगारांवर प्रथमच कारवाई झाल्याची चर्चाही होताना दिसून आली.

मात्र आता या घटनेने वेगळे वळण घेतले असून सदर फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात  पोलीस हे. कॉ. ढवळे यांनी  सुमन उर्फ अमोल दत्तात्रय रणदिवे रा.तुंगत ता.पंढरपूर , धनाजी मधुकर रणदिवे रा.तुंगत ता.पंढरपूर , सुधिर रामदास आंध रा.तुंगत ता.पंढरपूर , धनाजी जालिंदर गोडसे रा.येवती ता.मोहोळ ,व आणखी एकाच्या विरोधात सदरचे फोटो फेसबुक या सोशल मिडीयावर प्रसिध्द करुन शासकिय कामाची गोपनियता भंग केली व पोलीस ठाणेची प्रतिमा मलिन केल्याने मुंबई पोलीस कायदा कलम – 120 सहकलम 3 शासकिय गुपिते अधिनियम 1923 सह माहिती व तंत्रज्ञान कायदा – 2000 चे कलम – 72 सह भादंवि कलम – 500 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

4 hours ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 week ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

3 weeks ago