कौठाळी ग्रामसभेत निकृष्ट कामांच्या चौकशीचा ठराव मंजूर तरीही जि.प.प्रशासन दखल घेईना

कौठाळी ग्रामसभेत निकृष्ट कामांच्या चौकशीचा ठराव मंजूर तरीही जि.प.प्रशासन दखल घेईना 

कौठाळी ग्रामस्थ उग्र आंदोलनाच्या तयारीत

केंद्र सरकारच्या विविध योजना,राज्य सरकारच्या विविध योजना तसेच 14 वा 15 वा वित्त आयोग याच्या माध्यमातून शासनाने थेट ग्रामपंचायतींना गेल्या काही वर्षापासून थेट निधी देण्याचे धोरण अवलंबले आहे.स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांनी तीस वर्षापुर्वी स्थानिक पातळीवरील भ्रष्टाचाराची सुरस कहाणीच आपल्या भाषणातून कथन केली होती.यात शासन जेव्हा एखाद्या योजनेसाठी 100 रुपये मजूर करते त्यावेळी केवळ 15 रुपये शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.कौठाळी हे पंढरपूर तालुक्यातील नदीकाठचे बागयती शेतजमीनीमुळे संपन्न आणि संत एकनाथ महाराज यांच्या पालखी मार्गावरील गाव त्यामुळे या गावास आता पर्यंत विविध योजनेसाठी लाखो रुपयांचा निधी थेट ग्रामपंचायत अथवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे.मात्र या निधीतून झालेली कामे अतिशय निकृष्ट दर्जाची किवा बोगस झालेली आहेत अशी तक्रार येथील ग्रामस्थ ऍड.दत्तात्रय सुखदेव पाटील व लक्ष्मण जगन्नाथ नागटिळक यांनी थेट जिल्हाधिकारी,जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे केली आहे.या तक्रारी सोबत या गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व विविध योजनेअर्तंगत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालेली कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत अशी तक्रार केली आहे.आणि सर्वात गंभीर बाब म्हणजे सदर कामे ही निकृष्ट दर्जाची झालेली आहजेत असे ठराव ग्रामपंचायतीच्या आमसभेत मंजूर होऊनही त्या बाबत  कुठलीही कारवाई होताना दिसून येत नाही.त्या मुळे आता आम्ही दाद मागायची तरी कशा पध्दतीने की भ्रष्टाचार होताना व निकृष्ट पध्दतीने कामे होताना मुग गिळूण गप्प बसायचे असा सवाल ऍड.दत्तात्रय पाटील यांनी पंढरी वार्ताशी बोलताना व्यक्त केला आहे.
या बाबत वरील दोन्ही तक्रारदारांनी आपल्या तक्रारी दाखल करुनही दखल घेतली जात नसल्यामुळे थेट प्रसिध्दीमाध्यमांकडे धाव घेतली आहे.त्यांनी दिलेल्या माहीतीनुसार कौठाळी येथील चौपाळवस्ती ते कौठाळी हा जोडरस्ता क्र.51 या रस्त्याचे काम शासनाने विहीत केेलेल्या इस्टीमेट नुसार झालेले नाही.सदर काम एका राजकिय नेत्याने केले असल्याचे सांगीतले आहे.हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला असून या रस्त्याच्या कामात अतिशय कमी प्रमाणात व इस्टीमेटमध्ये नमुद केलेल्या नियमानुसार खडी वापरली  नाही तसेच रस्त्याची वास्तव लांबी व रुंदी व इस्टीमेट मधील मानके यात मोठा फरक असल्याचे त्यांनी तक्रारीत नमुद केले आहे.या बाबत ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत हे काम निकृष्ट झाल्याचा ठरावही मंजुर झाल्याचे त्यांनी सांगीतले आहे.त्याच बरोबर कौठाळी येथील जयराम वस्ती येथील अंगणवाडीचे काम प्लॅन इस्टीमेट नुसार झालेले नाही,तसा ठराव ग्रामसभेत मंजुर झाला आहे.याच बरोबर गंभीर  बाब  म्हणजे कौठाळी ग्रामपंचायतीच्या वतीने गावात विविध ठिकाणी आर.ओ.फिल्टर बसविण्यात आले आहेत.या फिल्टर मधून 5 रुपयाचे काईन टाकल्यानंतर 20 लिटर शुध्द पिण्याचे पाणी ग्रामस्थांना मिळते.मात्र गेल्या गेल्या 4 ते 5 वर्षापासून या या फिल्टरच्या माध्यमातून लाखो लिटर शुध्द पाणी विकण्यात आले मात्र त्याचा कुठलाही हिशोब ग्रामपंचायत देत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.याबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी ग्रामसेवक जाडकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत फोन कट केला.
ऍड.दत्तात्रय सुखदेव पाटील व लक्ष्मण जगन्नाथ नागटिळक यांनी पंढरी वार्तास दिलेल्या माहीतीनुसार कौठाळी ग्रामपंचायतीस राष्ट्रीय पेयजल योजनेतून चौफाळ येथील पाण्याच्या टाकीपासून ते गावठाणातील विहीरीपर्यंत पाईपलाईन काम सुरु झाले आहे.सदर पाईपलाईनचे काम चुकीच्या व निकृष्ट पध्दतीने होत असून सदर पाईपलाईन थेट रस्त्यातून न टाकता रस्त्याच्या कडेने टाकावी अशी मागणी केली होती मात्र त्याची सरपंचानी कुठलीही दखल घेतली नाही.सदर काम निकृष्ट झाल्यामुळे कागदोपत्री काम झाले तरी ग्रामस्थांना त्याचा लाभ मिळणे कठीण आहे अशी प्रतिक्रीॅया ऍड.दत्तात्रय पाटील यांनी पंढरी वार्ताशी बोलताना व्यक्त केली.
एकीकडे शासन ग्रामपंचयात स्तरावर थेट निधी उपलब्ध करुन देवून कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करुन विविध विकासकामे करु पहात आहे त्याच वेळी शासकिय यंत्रणेतील भ्रष्ट प्रवृत्तीमुळे व ज्यांच्याकडे हे कामे दर्जेदार पध्दतीने करुन घेण्याची जबाबदारी शासनाने सोपविली आहे तेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी जर याबाबत मौन बाळगत असतील आणि ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत सदर कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत यावर शिक्कामोर्तब होऊनही कुठलीही कारवाई होत नसेल आणि सुजाण नागरिक तक्रार करुनही त्याची दखल घेतली जात नसेल तर दाद मागायची तरी कुणाकडे असा सवाल ऍड.दत्तात्रय पाटील यांनी पंढरी वार्ताशी बोलताना उपस्थित केला अहे. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

4 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

3 weeks ago