आदमीले फूडसचा बुधवारी शुभारंभ

आदमीले फूडसचा बुधवारी शुभारंभ 

पंढरपूरातील खवय्यांना सहकुटुंब घेता येणार आस्वाद

गेल्या पाच दशकांपासून आदमीले बंधूंची भेळ म्हणजे पंढरपूर शहराची एक ओळख बनली आहे.उद्योग,व्यवसाय आणि नोकरीच्या निमित्ताने पंढरपूर बाहेर गेलेले पंढपुरकर जेव्हा पंढरपुरात येतात तेव्हा आदमीले यांची भेळ खाण्यास जाणे हा आवडीचा विषयठरला आहे.त्यामुळे आदमीले हा एक ब्रँड म्हणून राज्यभरात ओळखला जाऊ लागला आहे.आणि आपल्या ग्राहकांना सहकुटुंब याचा आस्वाद घेता यावा म्हणून आता आदमीले फूड्स या नव्या फर्मचे उदघाटन बुधवार दिनांक १९ रोजी गोविंदपुरा येथे सायंकाळी ठीक ७ वाजता मा.आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्याहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आ. भारत भालके हे भूषवणिनार आहेत. 

   या कार्यक्रमास ह भ.प.मदन महाराज हरिदास,मर्चंट सह.बँकेचे चेअरमन नागेश भोसले,नगराध्यक्षा साधना भोसले,सोलापूर जनता सह. बँकेचे माजी चेअरमन मुकुंद देवधर,रुक्मिणी सहकारी बँकेच्या चेअरमन सुनेत्रा पवार,माजी नगराध्यक्ष   लक्ष्मण शिरसट,आर्यवैश्य कोमटी समाजाचे अध्यक्ष रजनीश कवठेकर    सिने अभिनेते शाम सावजी,सत्यविजय मोहोळकर,प्रसिद्ध व्यापारी सारंग फडे,धनंजय कोताळकर आदी उपस्थित राहणार आहेत. 

    तरी आदमीले फूड्सच्या या उदघाटन सोहळ्यास उपस्थित रहावे अशी विनंती आदमीले बंधू यांच्यावतीने करण्यात येत आहे. 

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

1 week ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago