मा.नगराध्यक्ष स्व. नारायण धोत्रे यांचा ९ वा स्मृतिदिन विविध उपक्रम साजरा 

मा.नगराध्यक्ष स्व. नारायण धोत्रे यांचा ९ वा स्मृतिदिन विविध उपक्रम साजरा   

पंढरपूर नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष दलितमित्र स्व. नारायण धोत्रे यांच्या ९ व्या  स्मृतिप्रीत्यर्थ पंढरीत मा.सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत ३१ जानेवारी रोजी विविध विधायक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
    सकाळी ठीक १० वाजता रामकृष्ण वृधाश्रम येथे मा. सुधाकरपंत परिचारक यांच्या शुभहस्ते तर जि.प. सदस्य वसंत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व नगरसेवक संग्राम अभ्यंकर,विवेक परदेशी,धर्मराज घोडके,आदित्य फत्तेपूरकर,नवनाथ रानगट आदींच्या प्रमुख उपस्थितीत वृद्धांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.
  सकाळी ठीक ११ वाजता गणेशरूग्णसेवा संचलित मूकबधिर विद्यालयात मा. नगराध्यक्ष वामन बंदपट्टे यांच्या हस्ते व मा.उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नगरसेवक इब्राहिम बोहरी,राजू सर्वगोड,बजरंग देवमारे,अमोल डोके,अंकुश पवार,गणेश पवार यांच्या उपस्थितीत मूकबधिर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.
  दुपारी ठीक १२ वाजता नवजीवन निवासी अपंग शाळा येथे विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. नगराध्यक्षा साधना भोसले यांच्या हस्ते व उपनगराध्यक्षा लतिका डोके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमास नगरसेविका सुप्रिया डांगे, आदी उपस्थित होत्या.
  दुपारी ठीक १२.३० वाजता शाहिद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा येथे मा.नगराध्यक्ष सतीश मुळे यांच्या हस्ते व मा. नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमास नगरसेवक अनिल अभंगराव,डी.राज सर्वगोड,रामभाऊ माळी,विकास टाकणे आदी उपस्थित होते.
  या सर्व कार्यक्रमास प्रणव परिचारक मुन्ना गिरी गोसावी, दत्ता सिंह राजपूत, गणेश पवार, तात्या कांबळे, नितीन शेळके, सौदागर मोळक, संतोष जाधव,  अनिल जाधव, शिंदे नाईक, राजू कांबळे, प्रमोद सागर, संतोष काळे, तुळजाराम बंदपट्टे, धनाजी वाघमारे, संतोष बंदपट्टे, लाला शिंगाडे, महादेव पवार, शंकर पाथरूड, नितीन धोत्रे, औदुंबर सिंगाडे, भीमराव पवार, आनंद कासट, नितीन कांबळे आदी उपस्थित होते.
  हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा.नगराध्यक्ष दगडू धोत्रे आणि समाजसेवक दत्तात्रय धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरत्न तरुण मंडळ,आदिशक्ती तरुण मंडळ, ज्ञानेशवर नगर,रमजाने तरुण मंडळ डवरी गल्ली,न्यू वडार समाज गणेशोत्सव मंडळ,न्यू वडार समाज नवरात्र महोत्सव मंडळ,गजानन महाराज भक्त मंडळ आदींच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

6 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

1 week ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

3 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

3 weeks ago