ताज्याघडामोडी

घरच्यांच्या विरोधात जात प्रेमविवाह; पण छठपूजेसाठी पैसे मागितल्याने पत्नीची निर्घृण हत्या

उत्तर प्रदेशातील देवरिया येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे पत्नीने छठपूजेसाठी पैसे मागितल्याने पती इतका नाराज झाला की त्याने पत्नीची निर्घृण हत्या केली. त्यानंतर मृतदेह ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये भरून गावातून पळ काढला. सध्या ग्रामस्थांच्या माहितीवरून पोलिसांनी 36 तासांनंतर आरोपी पतीला अटक केली आहे.

त्याच्या माहितीवरून कुशीनगर जिल्ह्यातून एका महिलेचा मृतदेहही सापडला आहे. सुरौली पोलिसांनी आरोपीविरुद्ध हुंडाबळीसह अनेक गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटकेनंतर तपास करून पुढील कारवाई करण्यात येत आहे. सुरौली पोलीस ठाण्याच्या सुकई परसिया या गावातील रहिवासी आलोक उर्फ विपिन सिंहने याच गावात राहणाऱ्या खुशबू सिंहसोबत 2018 मध्ये प्रेमविवाह केला होता. विपिनचे कुटुंबीय मुलीला ठेवण्यास तयार नव्हते. मात्र, गावात झालेल्या पंचायतीनंतर कुटुंबाने होकार दिला.

खुशबूचे वडील हरी सहाय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलीने 2019 मध्ये एका मुलीला जन्म दिला होता. लग्नाला अनेक वर्षे झाली तरी मुलगा न झाल्याने सासरच्या मंडळींचा राग कायम होता. ते लोक खुशबूचा छळ करायचे. विपिननेही मारामारी सुरू केली. हुंडा म्हणून 10 लाख रुपयांची मागणी केली होती. तिने नकार दिल्यामुळे खुशबूचा दररोज छळ होत होता.

18 नोव्हेंबर रोजी आरोपी विपिन त्याच्या ट्रॅक्टरने शेतात नांगरणी करत होता. दरम्यान, पत्नी खुशबूने शेत गाठून छठपूजेच्या साहित्यासाठी पैशांची मागणी केली. गेल्या एक-दोन दिवसांपासून खुशबू पैसे मागत होती. विपिनने पत्नीला काही पैसेही दिले होते, मात्र पत्नी आणखी पैशांची मागणी करत होती. यावरून शेतातच दोघांमध्ये बाचाबाची झाली.

काही वेळातच प्रकरण इतकं वाढलं, की विपिनने खुशबूवर हल्ला केला. तिला मारहाण केल्यानंतर त्याने खुशबूचा तिच्या दुपट्ट्याने गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह शेतात लपवून त्वरीत घरी पोहोचला. तिथे त्याने ट्रॅक्टरला ट्रॉली जोडली आणि नंतर शेतात परतला. तिथून खुशबूचा मृतदेह एका ट्रॉलीत भरून पेंढ्याखाली लपवला आणि घटनास्थळावरून पळ काढला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

7 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago