ताज्याघडामोडी

शरद पवार यांची अचानक प्रकृती बिघडली, डॉक्टरांचा आराम करण्याचा सल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते शरद पवार यांची आज अचानक प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी महत्त्वाच्या दोन बैठका बोलावण्यात आल्या होत्या.

पण दुपारी दोन वाजेच्या सुमारास शरद पवार यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांच्या कन्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी कार्यक्रमस्थळी येऊन शरद पवारांची तपासणी केली. यावेळी डॉक्टरांनी शरद पवारांना आराम करण्याचा सल्ला दिला.

शरद पवार यांची अचानक प्रकृती बिघडल्यानंतर त्यांचे पुढच्या काही दिवसांचे दौरे रद्द करण्यात आले आहेत. शरद पवार उद्या पुरंदरच्या दौऱ्याला जाणार होते. पण डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे शरद पवारांचा पुरंदरचा दौरा रद्द करण्यात आला आहे. शरद पवार यांना सर्दीचा त्रास जाणवत होता, अशीदेखील माहिती समोर येत आहे.

दरम्यान, शरद पवार यांची सध्या प्रकृती बरी असल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार सध्या बारामतीत आपल्या घरी आराम करत आहेत. तसेच ते तब्येत बरी होईपर्यंत बारामतीतच आराम करणार असल्याची माहिती मिळत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

1 week ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago