ताज्याघडामोडी

मंगळवेढा तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करण्यासाठी आमदार अवताडे मुख्यमंत्र्याच्या भेटीला

दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश होणार.. मुख्यमंत्र्याचे आश्वासन

मंगळवेढा प्रतिनिधी

ट्रिगर च्या आधारे निकष लावून नुकतीच दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर झाली आहे या यादीमधून सात ऑक्टोबर 2017 च्या शासन निर्णयातील निकषानुसार मंगळवेढा तालुक्याचे नाव वगळल्याचे दिसून येत आहे तरी मंगळवेढा तालुका हा आवर्षण प्रवण तालुका आहे मोठ्या प्रमाणावर पावसाचा खंड पडल्याने हंगाम वाया गेला आहे 50% पेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल ही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे त्यामुळे तात्काळ दुष्काळ यादीमध्ये तालुक्याचा समावेश करावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असून मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांना सूचना देऊन अहवाल मागवून घेतला आहे अशी माहिती आमदार समाधान आवताडे यांनी बोलताना दिली. 

आ आवताडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रामध्ये असे म्हटले आहे की मंगळवेढा तालुक्यामध्ये सध्या चाऱ्याची परिस्थिती गंभीर झाली असून मिळत त्या भावाने पशुपालक चारा मागवत आहेत. तालुक्यातील ओढे, नाले, तलाव, विहिरी हे नैसर्गिक स्त्रोत पावसाने न भरल्यामुळे कोरडे ठप्प आहेत परिणामी भूजल पातळीमध्ये कोणतीही वाढ झाली नसून हजार ते बाराशे फुटाच्या खाली पाणी पातळी गेली आहे त्यामुळे येथील शेतकरी व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन करावी लागत आहे

तालुक्यामध्ये दररोज चार ते साडेचार लाख लिटर दूध संकलन होत असून त्या जनावरांना साडेचार ते पाच हजार रुपये मेट्रिक टन दराने बाहेरून ऊस घेऊन घालावा लागत आहे गेल्या महिन्यात मी केलेल्या गावभेट दौऱ्यामध्ये सुद्धा शेतकरी पशुपालक चारा डेपो किंवा चारा छावणी सुरू करा अशी मागणी करत होते त्यानुसार याआगोदरही आपल्याकडे व उपमुख्यमंत्री यांच्याकडे लेखी पत्रव्यवहार केला आहे.तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून मंगळवेढा तालुक्याचा दुष्काळग्रस्त किंवा टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करावा अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ ते पत्र मदत व पुनर्वसन विभागाकडे वर्ग करून अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

1 week ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago