Categories: Uncategorized

मा.आ.प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मयोगी विद्यानिकेतन कडून पंढरीत स्वच्छता अभियान

मा.आ.प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांमार्फत वृक्षारोपण व स्वच्छता अभियान संपन्न झाले. इयत्ता १ली व २ री च्या विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण केले तर इयत्ता ३री व ४थी च्या विद्यार्थ्यांनी चंद्रभागा वाळवंट या ठिकाणी स्वच्छता करून मदत केल्याबद्दल समस्त पुंडलिक कोळी समाज बांधवांना आभार पत्र देऊन त्यांचे आभार व्यक्त केले. त्याचप्रमाणे पंढरपूर बस स्थानक या ठिकाणी इयत्ता ५वी ते ७वी च्या विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छता करून त्या ठिकाणी स्वच्छतेविषयी जनजागृती करणारे पथनाट्य सादर केले. यावेळी आगार प्रमुख श्री. वाकळे साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांमार्फत सहकार्य करून प्रशालेच्या प्राचार्या व इतर शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी या स्तुत्य उपक्रमाचे आगार प्रमुखांकडून कौतुक करण्यात आले.

        याचबरोबर पंढरपूर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये इयत्ता ८वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता करून रेल्वे स्टेशन अधिकारी यांना स्वच्छता अभियानाची माहिती दिली. तसेच सर्व विद्यार्थ्यांना त्या  ठिकाणी प्रशालेचे पालक श्री.मिलींद येळे व  पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री.पंडित शेंबडे, श्री.महादेव बागल, श्री.महादेव लवटे,श्री.अरूण नागटिळक यांच्याकडून अल्पोपहार देण्यात आला. यावेळी रेल्वेस्टेशन प्रबंधक जी.पी.चंदगौडा यांनी विद्यार्थ्यांना रेल्वे प्रशासन व कामकाजाबद्दल माहिती दिली. तसेच यावेळी आरपीएफ इन्चार्ज सुहास जाधव व इतर अधिकारी उपस्थित होते याचबरोबर प्रशालेच्या प्रांगणामध्ये देखील इयत्ता ९वी १०वी च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता करून मा. प्रशांतराव परिचारक यांना वाढदिवसानिमित्त कार्यरूपी शुभेच्छा दिल्या. या स्तुत्य अभियानाची संकल्पना प्रशालेच्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांची होती.या अभियाना साठी संस्थेचे प्रमुख विश्वस्त श्री.रोहन परिचारक, रजिस्ट्रार श्री. गणेश वाळके यांनी शुभेच्छा दिल्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

5 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago