ताज्याघडामोडी

आ आवताडे यांच्या प्रयत्नांतून मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण आरोग्य उभारणीसाठी ३ कोटी ३० लाख रुपये निधी मंजूर

प्रतिनिधी –

केंद्रीय १५ वा वित्ती आयोग अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागातील खोमनाळ, कात्राळ, ढवळस व अकोला येथे नव्याने मंजुरी भेटलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उभारणीसाठी प्रत्येकी ५५ लाख असे २.२० कोटी व मंगळवेढा आणि पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय केंद्रातील “ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट” निर्मितीसाठी प्रत्येकी ५५ लाख असे १.१० कोटी निधी मंजूर झाल्याचे पत्र आमदार जनसंपर्क कार्यालयाकडे प्राप्त झाले आहे. या निधीमुळे तालुक्यातील आरोग्य सेवेला खूप मोठे वैभव मिळणार आहे. मंगळवेढा ग्रामीण व पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये मंजूर झालेल्या बीपीएचओ केंद्रामुळे रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांना उपचारापूर्वी व उपचारादरम्यान बसण्यासाठी तसेच थांबण्यासाठी सोय उपलब्ध होणार आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्य सोयी-सुविधा सक्षम करण्यासाठी आ. आवताडे यांनी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करुन उपकेंद्र उभारणीसाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली होती. आ. आवताडे यांच्या या मागणीचा शासनदरबारी संवेदनशील पद्धतीने विचार होऊन निधीला मंजूरी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री ना.डॉ.मनसुख मांडवीय व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. डॉ. भारती पवार यांच्या माध्यमातून या मागणीच्या अनुषंगाने सदर विकास कामांना निधी वर्ग करण्यात आला आहे.

तालुक्यामध्ये नव्याने निर्माण होणाऱ्या या उपकेंद्राच्या उभारणीमुळे संबंधित ग्रामीण भागातील अनेक रुग्णांची आरोग्य सेवा आणखी गतिमान आणि सुलभ होणार आहे. तालुक्यातील आरोग्य सेवेच्या अनुषंगाने वरील उपकेंद्र उभारणीसाठी या भागातील जनतेचा अनेक दिवसांपासूनच्या मागणीला अखेर आ. समाधान आवताडे यांच्या विकासात्मक भूमिकेमुळे मोठे यश मिळाल्याच्या भावना जनतेतून व्यक्त होत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

6 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

1 week ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

3 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

3 weeks ago