ताज्याघडामोडी

कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे कर्मयोगी स्मृती महोत्सव संपन्न

पंढरपूर: कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर या ठिकाणी श्रद्धेय कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित भव्य आंतरशालेय विविध सांस्कृतिक कलागुण स्पर्धांनी कर्मयोगी स्मृती महोत्सव संपन्न झाला. या स्मृति महोत्सवांमध्ये पंढरपुरातील सर्व नामवंत शाळांमधील विद्यार्थी विविध स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.

         या स्पर्धेमध्ये २ गटांमध्ये १० उपक्रम घेण्यात आले. यामध्ये रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व, निबंध, भाज्यांची सजावट, फुलांची सजावट, तसेच भगवद्गीता श्लोक पठण, सुभाषित माला पाठांतर, एकपात्री अभिनय व अत्यंत अनोखी आणि वेगळ्या पद्धतीची स्पर्धा म्हणजे शालेय सौंदर्य स्पर्धा. अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी साठी अशा प्रकारच्या अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धेमध्ये पंढरपुरातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन भरघोस पारितोषिके प्राप्त केली. या विविध स्पर्धांचे परीक्षण करण्यासाठी पंढरपुरातील नामवंत शाळेचे शिक्षक तसेच मुख्याध्यापक आणि नामांकित चित्रपट कलाकार श्री. श्रीकांत बडवे-महाजन यांना निमंत्रित करण्यात आले होते.

        या स्पर्धेचे आयोजन प्रशालेच्या सर्व कलागुणसंपन्न प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांनी केले. तसेच या कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरणासाठी पंढरपुरातील प्रसिद्ध संगीत विद्यावाचस्पती श्री. प्रसाद कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ सीमाताई परिचारक या होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे समन्वयक श्री. गिरीश खिस्ते यांनी केले तर आभार सारिका बनसोडे यांनी मानले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेच्या सांस्कृतिक समन्वयक व सौ. वृषाली काळे, सर्व शिक्षक व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. संस्थेचे प्रमुख विश्वस्त मा.श्री. रोहनजी पारिचारक यांनी सहभागी विद्यार्थी विद्यार्थिंनींचे कौतुक केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपुरात भारतरत्न मा.पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ३२ व्या पुण्यस्मरणा निमित्त आदरांजली अर्पण

कॉग्रेस प्रेमी प्रियदर्शनी विचार मंचकडून स्व.राजीव गांधींच्या आठवणींना उजाळा देशाचे माजी पंतप्रधान,आधुनिक भारताच्या स्वप्नाची मूहूर्तमेढ रोवणारे भारतरत्न…

8 hours ago

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

1 week ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 weeks ago