ताज्याघडामोडी

ईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्सवर छापा टाकला, पण १३०० किलोपैकी फक्त ४० किलोच सोनं हाती लागलं

जळगावातील राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीच्या पथकाकडून छापेमारी करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान ईडीने तब्बल १ कोटी रुपयांची रोकड आणि ३९ किलोंची सोने आणि हिऱ्यांचे दागिने जप्त केले होते. या दागिन्यांची किंमत तब्बल २५ कोटी रुपयांच्या घरात आहे. राजमल लखीचंद ज्वेलर्सचे मालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्यावरील ईडी कारवाईपाठी राजकीय दबाव असल्याची चर्चा आहे. ईश्वरलाल जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि पक्षाचे खजिनदार होते. त्यामुळे ईडीच्या या कारवाईचा संबंध शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राजकीय वादाशी जोडला जात आहे.

मात्र, या सगळ्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी राजमल लखीचंद ज्वेलर्सवर छापा टाकला तेव्हा त्याठिकाणी खूप मोठ्याप्रमाणात सोन्याचा साठा असेल, असा अंदाज होता. मात्र, ईडीच्या या कारवाईत १३०० किलोपैकी फक्त ४० किलोच सोने हाती लागल्याची माहिती आहे. ईडीने ईश्वरलाल जैन यांच्या संपत्तीचा तपशील तपासला होता. यावेळी त्यांच्या तीन ज्वेलरी कंपन्यांकडून बोगस व्यवहारांच्या नावाखाली पैशांची अफरातफर होत असल्याचा संशय आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात सीबीआयकडून राजमल लखीचंद ज्वेलर्स, आर.एल. गोल्ड आणि मनराज ज्वेलर्स या कंपन्या आणि त्यांचे प्रवर्तक असलेले ईश्वरलाल जैन, मनिष जैन आणि त्यांच्या अन्य कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या आरोपींनी स्टेट बँकेकडून ३५३ कोटी रुपयांचे कर्ज घेऊन हप्ते थकवल्याचा आरोप आहे. सीबीआयने नोंदविलेल्या या गुन्ह्याच्या आधारे ईडीने ईश्वरलाल जैन यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा नोंदवला.

ईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्सवर छापा टाकला तेव्हा सोन्याचा बरासचा साठा त्याठिकाणी आढळला नाही. लखीचंद ज्वेलर्सने त्यांच्याकडे बँकेकडून कर्ज घेताना १२८४ किलो सोन्याचे दागिने असल्याची माहिती जाहीर केली होती. मात्र, प्रत्यक्षात त्याठिकाणी केवळ ४० किलो सोन्याचेच दागिने सापडले. त्यामुळे बँकेकडून कर्जापोटी घेतलेल्या ३५३ कोटी खोटे खरेदी व्यवहार दाखवून इतरत्र वळवण्यात आले, असे ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. राजमल लखीचंद ज्वेलर्स, आर.एल. गोल्ड आणि मनराज ज्वेलर्स या तिन्ही कंपन्यांच्या प्रवर्तकांना बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा विनियोग नेमका कुठे करण्यात आला, याबद्दल कोणतीही कागदपत्रे सादर करता आलेली नाहीत. त्यामुळे ईश्वरलाल जैन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

6 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago