ताज्याघडामोडी

स्वेरीची शैक्षणिक वाटचाल अभिमानास्पद -आमदार राम सातपुते

स्वेरीच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ थाटात संपन्न

पंढरपूर- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण मिळावे या उदात्त हेतूने अत्यंत हालअपेष्टा सहन करत आणि स्वतःला चंदनाप्रमाणे झिजवून अनेक अडचणींतून मार्ग काढत डॉ. बी.पी. रोंगे सरांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसाठी  तंत्रशिक्षणाचे द्वार खुले केले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल करिअरच्या दृष्टीने संस्थेच्या स्थापनेपासूनच अनेक नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे स्वेरीला विविध पातळ्यांवर अभूतपूर्व यश मिळत आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सर्वोत्तम पद्धतीने तंत्रशिक्षणाचा प्रसार करत असलेले स्वेरी हे बहुधा एकमेव शिक्षणसंकुल असावे. मी देखील विद्यार्थी चळवळीतून पुढे आलो. विद्यार्थ्यांची पॉवर दाखवत आणि वंदे मातरम’ चा नारा देत शिक्षण घेतले. आज अभियंता असूनही   राजकारणात एक सकारात्मक विचार घेऊन व  समाजासाठी काहीतरी करावे या हेतूने डॉ. रोंगे सरांची आणि त्यांच्या टीमची प्रेरणा घेत त्यांचे अनुकरण करत आहे. स्वेरीचे विद्यार्थी आज प्रचंड प्रमाणात यशस्वी होत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडवून त्यांचे करिअर बनवण्याचे अत्यंत  अवघड कार्य डॉ. रोंगे सरांनी हाती घेतले आहेहे खरोखर कौतुकास्पद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाला अधिक वेळ न देता स्वतःला घडविण्यासाठी जास्तीत जास्त वेळ द्यावा. आपल्या आई-वडिलांचे ऋण फेडण्यासोबतच आपल्याला देश घडवायचा आहे हे आपण लक्षात ठेवावे.’ असे प्रतिपादन माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांनी केले.

      स्वेरी संचालित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते हे मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरसोलापूर विद्यापीठसोलापूरचे प्रभारी कुलगुरू डॉ. रजनीश कामत हे होते. दीप प्रज्वलनानंतर स्वेरी गीताच्या ध्वनीमुद्रिकेचे  अनावरण करण्यात आले. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी. पी. रोंगे यांनी प्रास्ताविकातून सर्वांचे स्वागत करून स्वेरीच्या रौप्य महोत्सवी वाटचालीवर प्रकाश टाकला. १९९८ साली पत्र्याच्या शेड पासून सुरु झालेला हा प्रवास मोठमोठ्या इमारतींपर्यंत  कसा पोहचलाया दरम्यान आलेल्या अडचणी आणि त्यावर केलेली मात यावर त्यांनी प्रकाश टाकला. पुढे डॉ. बी.पी.रोंगे म्हणाले की, ‘स्वेरीच्या या पंचेवीस वर्षांच्या काळात अनेक ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे सहकार्य लाभले. त्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी मी त्यांच्या ऋणात राहणे पसंत करतो. या स्वेरीच्या रौप्य महोत्सवी वाटचालीत माझे गुरु विठ्ठल भगवान कुलकर्णी तथा आप्पा सर यांच्यापासूनपंढरपूर तालुक्याचे आमदार  कै.सुधाकरपंत परिचारकतत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दत्तात्रय राणेराज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा  पाटीलमाजी कुलगुरू धनागरेआमदार दिलीप वळसे-पाटीलकै. पी. बी. पाटीलहभप तनपुरे महाराजभारताचे शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकरबाटूचे माजी कुलगुरू डॉ.अशोक घाटोळसोलापूरच्या वालचंदचे प्राचार्य कै.डॉ.मदनाईक यांच्यासहअर्बन बँकेचे अधिकारी भिंगेगोपाळपूरचे सर्व सरपंच व ग्रामस्थस्वेरीचे सर्व  देणगीदारकुटुंबीयनातेवाईकमित्र परिवार तसेच अनेक ज्ञात व अज्ञात व्यक्तींनी स्वेरीला घडवण्यात मोलाचे योगदान दिले.‘ शिक्षण संचालनालयाचे माजी अध्यक्ष डॉ.एन. बी. पासलकर म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांचा विकास हाच ध्यास’ या धर्तीवर स्वेरीचे कार्य अविरतपणे सुरू आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.’ अध्यक्षीय भाषणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठसोलापूरचे प्रभारी कुलगुरू डॉ.रजनीश कामत म्हणाले की, ‘स्वेरीच्या संशोधनातील प्रगतीमुळे सर्वात प्रथम माझ्या कानावर स्वेरीचे नाव आले असून त्यावेळी स्वेरीमध्ये संशोधन क्षेत्रात नॅशनल नॉलेज नेटवर्क’ चे मोठे प्रोजेक्ट यशस्वी झाले होते. स्वेरी हे महत्त्वाच्या संशोधनाच्या संबंधी प्रबंध व प्रोजेक्ट सादर करणारे सोलापूर विद्यापीठामधील  महाविद्यालय असल्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. या ठिकाणी ग्रामीण आणि शहरी असा भेदभाव न राहता स्वेरीने तंत्रशिक्षणाचा विकास आणि त्याचा दर्जा सिद्ध केलेला आहे. पंचवीस वर्षाचा इतिहास उलगडताना स्वेरी सातत्याने करत असलेल्या परिश्रमाचे सार्थक झाले आहे. सर्वांचा विकास करत असताना व्हॅल्यू एज्युकेशन’ हे देखील महत्त्वाचे आहे. स्वेरीच्या  अनेक उपक्रमांमुळे  महाराष्ट्रामध्ये स्वेरी इंजिनिअरिंग महाविद्यालयाकडे आदर्श महाविद्यालय’ म्हणून पाहिले जाते. या महाविद्यालयात विद्यार्थी केंद्रित गोष्टी असतात म्हणून स्वेरीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या माध्यमातून स्वेरीतून घडविले जाते. हे अवघड कार्य असून अनेकांना जमले नाही ते स्वेरीने ग्रामीण भागात यशस्वीपणे करून दाखवले याचाही सार्थ अभिमान वाटतो.’ असे सांगून त्यांनी स्वेरीच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले. यावेळी स्वेरीवर गीत लिहिल्याबद्दल गीतकार प्रा.संतोष मडकी,  संगीतकार राजु पुरंदरेगायक योगेश गायकवाड आणि गायिका अनारकली काराळे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी स्वेरीच्या प्रा. नीता कुलकर्णी यांनी स्वेरीवर स्वरचित कविताही सादर केली. या प्रसंगी स्वेरीचे उपाध्यक्ष हनिफ शेखसंस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त नामदेवराव कागदेसंस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठलसंस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त प्रा. सी.बी. नाडगौडाविश्वस्त अशोक भोसलेविश्वस्त एच. एम. बागलविश्वस्त बी.डी.रोंगेविश्वस्त एस.टी. राऊतयुवा विश्वस्त प्रा. सूरज रोंगेविठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सौ.प्रेमलता रोंगेडॉ.श्रीदेवीस्त्रीरोग तज्ञ डॉ.स्नेहा रोंगेप्रसिद्ध भारुडकार चंदाताई तिवाडीआर्किटेक्ट यादगिरी कोंडास्ट्रक्चरलचे प्रमोद जोशीबाटुचे माजी कुलगुरू डॉ. अशोक घाटोळस्वेरीच्या गव्हर्निंग बॉडीचे डॉ.विजय कुलकर्णीशास्त्रज्ञ व्ही. के. सूरीवालचंद सांगलीच्या प्लेसमेंट विभागाचे संजय धायगुडेमाजी विद्यार्थी संघटनेचे दत्ता घोडके,  डॉ.विश्वासराव मोरेस्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवारस्वेरी परिवारातील सदस्यविद्यार्थीपालकपंढरपूर पंचक्रोशीतील नागरिकपत्रकारवकील मित्रहितचिंतकसामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी केले तर संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांनी सर्व  उपस्थितांचे आभार मानले. स्वेरीच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने  सायंकाळी  स्वरानुभूती’ या सांस्कृतिक कार्यक्रमातून पार्श्वगायिका कार्तिकी गायकवाडकौस्तुभ गायकवाड व कल्याणजी गायकवाड यांच्या भक्ती गीतभावगीतमिमिक्रीच्या माध्यमातून सर्वांना मंत्रमुग्ध केले. एकंदरीतच स्वेरीचा रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ अतिशय उत्साहात पार पडला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

3 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 week ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

3 weeks ago