ताज्याघडामोडी

स्वेरीत ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ संपन्न

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा संयुक्त उपक्रम

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागांच्या संयुक्त विद्यमाने कन्व्हर्टीग इनोव्हेशन इन टू एन्ट्रप्रेन्युअरशीप अँड स्टार्टअप’ या विषयावर दि. २४ जुलै ते दि.२९ जूलै २०२३ दरम्यान एक आठवड्याचा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ हा  कार्यक्रम संपन्न झाला.

       स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आयोजिलेल्या या उपक्रमाचे उद्‌घाटन पुण्यातील निताल कॉम्प्युटर सिस्टम प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन नातू यांच्या हस्ते झाले. दीप प्रज्वलनानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या विभागप्रमुख डॉ. दिप्ती तंबोळी यांनी प्रास्ताविकात हा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ आयोजित करण्यामागचा  हेतू स्पष्ट केला. यावेळी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. स्वाती पवार या उपस्थित होत्या. या प्रोग्रामच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात सुदर्शन नातू यांनी इन्टरप्रेनर्स आणि त्यांचा प्रवास’ या विषयावर विचार व्यक्त केले. दुसऱ्या सत्रात तुषार मेहता यांनी इनोव्हेशन आणि पेटंट’ या विषयी माहीती दिली. दुसऱ्या दिवशी स्वेरीचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार यांनी नवीन विचारांना चालना कशी द्यावी व त्यांचा आदर कसा करावा’ या विषयावर अभ्यासपूर्ण माहिती दिली. प्रोग्रामच्या दुपारच्या सत्रात स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सोबस सेंटर ऑफ एक्सलन्स’ चे गिरिश संपथ यांनी बिझनेस कॅनव्हास आणि लीन कॅनव्हास विषयी माहिती दिली. इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या विभागप्रमुख डॉ. दिप्ती तंबोळी आणि इनोव्हेशन सेलच्या प्रमुख डॉ.विद्याराणी क्षीरसागर यांनी अॅक्टव्हिटी बेस्ड लर्निंग’ मधून बिजनेस आयडियाज’ विषयी माहीती दिली. तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात मयांक बॅनर्जी यांनी कन्वरटींग इनोव्हेशन इन स्टार्टअप’ बद्दल माहिती दिली. दुपारच्या सत्रात डॉ. प्रशांत मंडलके यांनी आयडीया टू बिजनेस जर्नी ऑफ अॅन इन्टरप्रेन्युअर’ याबाबत माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे म्हणाले की, ‘अशा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅममुळे विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यामध्ये संशोधन क्षमतेला अधिक चालना मिळते व स्पर्धात्मक युगात विज्ञान व तंत्रज्ञानात अधिक भर पडते.’ अंतिम सत्रात सुहास उलगडे यांनी प्रोजेक्ट रिक्वायरमेंट’ याबद्दल माहिती दिली. चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात अरकस बापू दिलीप यांनी कॉपोरेट अॅण्ड स्ट्रेटेजीक एन्ट्रप्रेन्युअरशीप’ याबाबत माहिती दिली. दुपारच्या सत्रात रणजीत शिंदे यांनी रोबोटीक प्रोसेस ऑटोमेशन’ याबद्दल माहिती सांगितली. चौथ्या दिवशीच्या अंतीम सत्रात अशोक सराफ यांनी डीटेल वर्क प्लॅनींगबद्दल माहिती दिली. पाचव्या दिवशीच्या पहिल्या सत्रात सौ. भावना अंबुडकर यांनी नॅशनल इनोव्हेशन अँड एन्ट्रप्रेन्युअरशीप पॉलीसी इंम्लीमेंटेशन’ याबद्दल माहिती दिली. दुपारच्या सत्रात अशोक सराफ यांनी क्वालिटी मॅनेजमेंट प्लान्स’ बद्दल माहिती दिली. आठवडाभर चाललेल्या या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये १०० पेक्षा अधिक प्राध्यापकांनी सहभाग घेतला. त्यावेळी सहभागी प्राध्यापकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या प्रोग्राम मध्ये अनेक संशोधकप्राध्यापक व तज्ञांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी व्यासपीठावर स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळसौ.नातूसंशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ.अमरजित केने यांच्यासह प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही विभागांच्या प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ.एम.पी.ठाकरे व प्रा.पी. डी. माने यांनी काम पाहिले. सुत्रसंचालन प्रा.एस.व्ही. मोहोळकरप्रा. निमिशा देवल यांनी केले. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. स्वाती पवार यांनी आठवडाभर चाललेल्या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ आपल्याला भविष्यात कशाप्रकारे उपयोगी आहे याबद्दल अभ्यासपूर्ण विचार मांडून उपस्थितांचे आभार मानले. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

2 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 week ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

3 weeks ago