ताज्याघडामोडी

स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ३६ विद्यार्थ्यांची ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ मध्ये निवड

 पंढरपूरःगोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या कॅम्पस इंटरव्युद्वारे तब्बल ३६ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस‘ या बहुराष्ट्रीय व  नामांकित कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून तब्बल ३६ विद्यार्थ्यांची टीसीएस निंजा ऑफर्ससाठी निवड केली. विद्यार्थ्यांच्या गुणात्मक अभ्यासाबरोबरच शिस्तआदरयुक्त संबंध व उत्कृष्ट शिक्षण पध्दती यामुळे निवड समिती अत्यंत प्रभावित झाली. त्यांनी या निवड प्रक्रियेतून वैष्णवी दिगंबर वाळकेशिवानी रामदास आटकळेरितिका सैनीवेदांगी मंगेश भुजंगआदित्य भागवत केसकरकुणाल बाळासाहेब शेटेमयुरी सोमनाथ स्वामीरविराज धोंडाप्पा कुडाळअजित सूर्यकांत गायकवाडउमेश विकास साठेराहुल किसन गपाटसुशांत मुकेश सुलाखेओंकार अजितकुमार काळेदीक्षा दीपक आदमिलेनिकिता नागनाथ पवारगणेश निलप्पा रुपनरप्रतीक्षा उद्धव पाटीलअनिकेत राजमहेंद्र मिठ्ठाशुभम गुलाबराव शेंडेरोहित दत्तात्रय कवितकेस्वप्निल भारत मोरेशुभम गोरख शेंडेभुषण सतीश देशमुखगौरव शिवाजी घायतिडककिरण रावसाहेब ऐगळेमाधुरी विलास डोंगरेमहेश सुनील देशमुखमाऊली संजय तळेकरनेहा बाबासाहेब कदमप्रतीक गोरख माळीसंकेत संभाजी बोडकेसौरभ विशाल शेंडेअक्षय प्रवीण हेतीयाअमृता कामराज डोंगरेओंकार अमसिद्ध बिराजदार व विशाखा विजयकुमार सावळकर असे मिळून स्वेरीच्या एकूण ३६ विद्यार्थ्यांची निवड केली. 

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस‘ ही कंपनी जगातील बहुतांश देशामध्ये आपली सेवा देत आहे. या नामांकित कंपनीमध्ये ६ लाखांपेक्षा अधिक कर्मचारी काम करत आहेत. ही कंपनी प्रत्येक वर्षी स्वेरीच्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देते. त्याचबरोबर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस‘ या  कंपनीचे अधिकारी वेळोवेळी स्वेरीच्या विद्यार्थ्यांना कार्पोरेट कल्चरसॉफ्ट स्कील अशा विषयावर मार्गदर्शन करत असतात. १९९८ साली स्थापन झालेल्या स्वेरी अभियांत्रिकीमध्ये विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या प्लेसमेंट साठी येत असतात आणि कंपनीसाठी पात्र अशा विद्यार्थ्यांची निवड करत असतात. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. या विद्यार्थ्यांना स्वेरी मध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये अॅप्टिट्यूडकम्युनिकेशन स्किलएडवॉन्स टेक्निकल ट्रेनिंगमॉक इंटरव्यूवग्रुप डिस्कशनसॉफ्टवेअर ट्रेनींग या व्यतिरिक्त जागतिक स्तरावर संधी मिळण्यासाठी जापनीज लैंग्वेज ट्रेनींग तसेच जीआरईटोफेल या संदर्भात मार्गदर्शन केले जाते.

सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातील तज्ञ प्राध्यापकांचे व विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगेसंस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगेउपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारीस्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवारस्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्यअधिष्ठाताविभागप्रमुखप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसया कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 छायाचित्र- स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगेस्वेरी चिन्ह व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ या कंपनीमध्ये निवड झालेले ३६ विद्यार्थी अनुक्रमे वैष्णवी वाळकेशिवानी आटकळेरितिका सैनीवेदांगी भुजंगआदित्य केसकरकुणाल शेटेमयुरी स्वामीरविराज कुडाळअजित गायकवाडउमेश साठेराहुल गपाटसुशांत सुलाखेओंकार काळेदीक्षा आदमिलेनिकिता पवारगणेश रुपनरप्रतीक्षा पाटीलअनिकेत मिठ्ठाशुभम शेंडेरोहित कवितकेस्वप्निल मोरेशुभम शेंडेभुषण देशमुखगौरव घायतिडककिरण ऐगळेमाधुरी डोंगरेमहेश देशमुखमाऊली तळेकरनेहा कदमप्रतीक माळीसंकेत बोडकेसौरभ शेंडेअक्षय हेटीयाअमृता डोंगरेओंकार बिराजदार व विशाखा सावळकर.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

5 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago