ताज्याघडामोडी

करियर घडविण्यासाठी अभियांत्रिकीची प्रत्येक शाखा महत्वाची : डॉ. एस पी पाटील

कर्मयोगी इंस्टीट्यूट मध्ये “अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया 2023-24” वर ऑनलाइन मार्गदर्शन वेबिनार संपन्न

अभियांत्रिकीच्या प्रत्येक शाखेमध्ये नोकरीच्या समान संधी उपलब्ध असून, करियर घडविण्यासाठी अभियांत्रिकीची प्रत्येक शाखा महत्वाची आहे. केवळ एका विशिष्ट शाखेमध्ये प्रवेश मिळाला तर च नोकरीच्या संधी आहेत असा भ्रम विद्यार्थ्यानी व पालकांनी काढून टाकून भविष्यामधील काळाची गरज ओळखून अभियांत्रिकीची शाखा निवडावी व प्रवेश प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करावी तसेच मिळालेल्या अभियांत्रिकीच्या शाखेमध्ये आपले उज्ज्वल भविष्य घडवावे असे मत कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालया चे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी केले. महाविद्यालयातर्फे आयोजित केलेल्या “अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया 2023-24” या विषयावर पालक व विद्यार्थ्यांना मार्गदशांनासाठी दि. २४ जून २०२३ रोजी आयोजित केलेल्या ऑनलाइन वेबिनार मध्ये ते बोलत होते. सदरच्या वेबिनार साठी फेसबूक लाईव, यू ट्यूब, झूम मीटिंग द्वारे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्रवेश प्रक्रिया प्रमुख व संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांनी अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी पात्रता, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया रजिस्ट्रेशन, कॅप राऊंड, वेळापत्रक आदि प्रक्रियेबद्दल सखोल मार्गदर्शन केले. तसेच प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. अभिनंदन देशमाने यांनी अभियांत्रिकी शिक्षणामद्धे विद्यार्थ्यांना असणारे आरक्षण, उपलब्ध जागा, सरकारकडून मिळणार्‍या सवलती, प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अश्या अनेक मुद्यांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा. जगदीश मुडेगावकर यांनी महाविद्यालयाची विस्तृत ओळख करून देऊन विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणार्‍या “कर्मयोगी पॅटर्न” ची माहिती देऊन त्यातून विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाचा चढता आलेख सादर केला. तसेच कर्मयोगी इंस्टीट्यूट मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेऊ इछिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी असणार्‍या “विद्यार्थी कल्याण योजने”ची सखोल माहिती व त्यासाठीची पात्रता याव्रर मार्गदर्शन केले. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहासिन शेख यांनी आत्तापर्यंत महाविद्यालयामध्ये शिकत असताना शिक्षण पूर्ण होण्या आधीच विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या नोकरीच्या संधी यावर विस्तृत मार्गदर्शन करून प्लेसमेंट चा आढावा सादर केला.

यावेळी श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन रोहन परिचारक यांनी ऑनलाइन वेबिनार ला शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, तसेच विभागप्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर च्या वेबिनार साठी प्रा. दत्तात्रय चौगुले यांचे तंत्रसहाय्य लाभले. प्रा. अनिल बाबर यांच्या आभार प्रदर्शनाने वेबिनार ची सांगता झाली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

4 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

3 weeks ago