ताज्याघडामोडी

कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर ची इ. १० वी १००% निकालाची परंपरा कायम

शैक्षणिक वर्ष २०२२-२३  मध्ये घेण्यात आलेल्या १० वी एस.एस.सी. परीक्षेचा निकाल आज दिनांक ०२.०६.२०२३ रोजी जाहीर झाला.

पंढरपूर येथील कर्मयोगी विद्यानिकेतन या प्रशालेचा दर वर्षी प्रमाणेच इयत्ता दहावीचा १००% निकाल लागला.एकूण 45 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. यामध्ये कुमार मयुरेश जाधव 93.60 % गुण मिळवून प्रशालेत सर्वप्रथम,कु.हर्षदा काळे 92.00%  गुण मिळवून प्रशालेत द्वितीय तर कांचन लिंगे 89.40 % गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. प्रशालेतील एकूण 22 विद्यार्थी विशेष गुणवत्ता श्रेणीमध्ये तर 18 विद्यार्थी प्रथम गुणवत्ता श्रेणीमध्ये व 5 विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.

या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे चीफ ट्रस्टी माननीय श्री रोहनजी परिचारक, प्रशालेच्या प्राचार्या सौ. प्रियदर्शिनी सरदेसाई व संस्थेचे रजिस्ट्रार श्री. गणेश वाळके यांनी केले. तसेच यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी देखील हजर होते.या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

4 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

7 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

3 weeks ago