पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून सावत्र आईने केलेल्या बेदम मारहाणीत एका १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सावत्र आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थेरगाव येथे रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही मायलेकी पिंपरी चिंचवड परिसरातील थेरगाव येथे राहण्यास आहेत. तेथील शिवशंभू सोसायटी येथे त्या राहतात. “घरातील साहित्य संपले असल्याचे अगोदर का नाही सांगितले”, या रागात आईने लाकडी बांबू आणि लाकडी फळीच्या तुकड्याने मुलीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलीला हाताला, पायाला, पाठीवर तसेचं डोक्याला मार लागला. तसेच तिच्या छातीवर हाताने व पायाने देखील आईने मारहाण केली. यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने मुलीचा मृत्यू झाला.
घटना घडल्यानंतर आईने मुलीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, दवाखान्यात खोटी माहिती देत शासकीय रुग्णालयात आणि पोलिसांना मुलीच्या मृत्यूबाबत दिशाभूल केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणाचा आधिक तपास वाकड पोलीसांकडून करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड परिसरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. नेहमी खून, दरोडा अशा घटना समोर येत आहेत. या गुन्हेगारीला आळा बसणे अत्यंत गरजेचं आहे. क्षुल्लक कारणाहून आईने मुलीची हत्या केली. या घटनेनं समाजात चुकीचा संदेश जात असून रागाला आळा घालणं देखील तितकेच गरजेचे आहे. या घटनेनंतर मुलीच्या आईला ताब्यात घेण्यात आले असून रागाच्या भरात आईने हे कृत्य केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.
अॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…