ताज्याघडामोडी

पहाटे साडेचार वाजता जावयाने सासूचा काढला काटा; मनात होता फक्त तो एक राग…

डिग्रस कऱ्हाळे येथे पत्नीसोबत शाब्दीक वाद झाल्यानंतर गळ्यावर जोराची लाथ मारली, त्यानंतर दोरीने गळा आवळून पत्नीचा खून केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली होती. हिंगोली ग्रामीण पोलिसांनी आरोपी पतीला तातडीने ताब्यात घेतले आहे. योगीता संतोष कऱ्हाळे (२८) असे मयताचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना ताजी असताना आज वसमत येथे पुन्हा एक धक्कादायक घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

वसमत येथील झेंडाचौक भागात कौटूंबिक वादातून जावयाने सासूचे दगडावर डोके आपटून खून केल्याची घटना आज सोमवारी पहाटे साडेचार वाजता घडली आहे. पोलिसांनी आरोपी जावयास ताब्यात घेतले आहे. शेवंताबाई वंजे (७५) असे मयत महिलेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील कविता यांचा विवाह श्रीरामपूर तालुक्यातील टाकळी बाण येथील बाबासाहेब सिनगारे (४८) याच्या सोबत झाला होता. त्यांना एक पाच वर्षाची मुलगी आहे. मात्र मागील चार वर्षापासून त्यांचे वाद होऊ लागले होते. त्यामुळे बाबासाहेब हा कविताला मारहाण करीत होता. त्यामुळे कविता तिच्या मुलीसह वसमत येथे माहेरी राहण्यासाठी आली होती. त्यानंतरही तो कविताकडे येत होता.

दरम्यान,रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता तो वसमत येथे आला होता. मात्र त्याच्या मारहाणीच्या भितीपोटी कविता तिच्या बहिणीकडे वाखारी येथे निघून गेली. आज पहाटे चार वाजण्या्च्या सुमारास बाबासाहेब सिनगारे व त्याची सासु शेवंताबाई यांच्यात वाद सुरु झाला. पत्नी कविता सासरी नांदायला येत नाही, या कारणावरून त्याने शेवंताबाई यांना मारहाण सुरु केली.

त्यानंतर त्यांच्या डोक्याला धरून डोके ओट्यावरील दगडावर आदळले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सदर प्रकार कळाल्यानंतर कविता देखील वाखारी येथून तातडीने वसमत येथे आल्या. या घटनेमध्ये जखमी झालेल्या शेवंताबाई यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

5 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago