ताज्याघडामोडी

मुलगा होत नाही, सासू म्हणाली भोंदूबाबाशी लगट कर, नवरा म्हणाला मित्राशी संबंध ठेव

लग्नानंतर अनेक महिलांना सासरच्या त्रासाला सामोरे जावे लागते. रंग रूप दिसण्यावरून, लवकर आई होत नाही अशा अनेक गोष्टी ऐकत काही विवाहितांना दिवस काढावे लागतात. अनेक वेळा आपण सासूने सुनेला मानसिक त्रास दिलेला ऐकले आहे. नेरुळ परिसरामध्ये सासू आणि नवऱ्याने हद्द पार केली. एखाद्या स्त्रीला मुलं होत नाही ह्यात तिची एकटीची काय चूक? हे समजून न घेता नको ते घाणेरडे आरोप करत विवाहितेला सासरकडील मंडळींनी भोंदूबाबाशी लगट करण्यास सांगितले, तसेच तिला पतीने स्वतःच्याच मित्राशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तशी तक्रार विवाहितेने पोलिसांत दिली आहे.

नेरुळमधील ३० वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरून तिच्या पतीसह सासरकडील मंडळींविरोधात छळवणुकीसह विनयभंग, बलात्कार, अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरूळ पूर्व भागात राहणाऱ्या तरुणाशी या तरुणीचा २०१७ मध्ये विवाह झाला होता. मात्र तिला वर्षभरानंतरदेखील मूल होत नसल्याने तिच्या पतीने चार वेळा कृत्रिमरीत्या गर्भधारणा (आयव्हीएफ) करण्याचा प्रयत्न केला; मात्र ते प्रयत्नसुद्धा यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे तिच्या पती, सासरकडील मंडळींनी तिला मूल व्हावे यासाठी डोंबिवलीतील एका भोंदूबाबाशी जबरदस्तीने लगट करण्यास भाग पाडले.

त्यावेळी भोंदूबाबाने तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिच्या पतीने मित्राशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडून फोटो आणि व्हिडीओ चित्रित केले. आणि स्वतःच्याच पत्नीला ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला त्याच मित्राशी अनेक वेळा शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. मात्र विवाहितेने शरीरसंबंध ठवण्यास विरोध केल्यास तिला शिवीगाळ, मारहाण करण्यात आली. तसेच तिने घटस्फोट द्यावा, यासाठी ऑक्टोबर महिन्यात तिला मारहाण करून घरातून बाहेर काढले, अशी तक्रार नेरूळ पोलिसांत देण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीसह सासू-सासरे, चुलतसासरे या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत. २१ लाखांचा हुंडा विवाहितेच्या सासरकडील मंडळींनी लग्नाच्या वेळी तिच्या कुटुंबीयांकडून हुंडा म्हणून घेतला होता. १७ लाख ४५ हजार रुपयांची रोख रक्कम, तसेच तीन लाख ७५ हजार रुपयांचे दागिने घेतल्याची तक्रार पोलिसांकडे केली असून पोलीस अधिक तपास पोलीस करत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 week ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

1 week ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

3 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

3 weeks ago