ताज्याघडामोडी

मला IPS व्हायचं होतं, मात्र…; १३ वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असलेल्या कारखेल बुद्रुक येथील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीने चक्क सुसाईट नोट लिहून आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. या घटनेनं संपूर्ण गावासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. दिक्षा बाबासाहेब शेलार असं या मुलीचं नाव आहे.

बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक येथे दिक्षा लहानपणापासून आपल्या मामांकडे राहत होती. तिचे आई-वडील हे ऊसतोड कामगार असल्याने मामा आणि आजोबा तिचा संभाळ करत होते. काल घरातील सर्वजण शेतात गेले असताना दिक्षा घरी एकटीच होती. दिक्षाने सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

सायंकाळी सहा ते सव्वा सहाच्या दरम्यान आजोबा आणि मामा हे घरी परतल्यानंतर दिक्षाचा ओढणीला लटकलेला मृतदेह पाहून घरातील सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर पोलिसांना तात्काळ या घटनेची माहिती देण्यात आली. आष्टी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, दिक्षाने आत्महत्या करण्याआधी एक सुसाईट नोट लिहिली होती.

या सुसाईट नोटमध्ये “मला आयपीएस व्हायचं होतं. मात्र, आता सगळं संपलंय… ताईला घेऊन जा तुमच्यासोबत कारखेलला, मी चालले आहे…”, असं लिहिलेली सुसाईट नोट पोलिसांना तिच्याजवळ सापडली. तिने लिहिलेल्या सुसाईटमध्ये “आता सगळं संपलं”, याचा नेमका अर्थ काय? याचा शोध देखील घेणार असल्याचं पोलिसांनी यावेळी सांगितलं आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून पुन्हा नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनंतर आष्टी तालुक्यासह अख्या जिल्हाभरात आयपीएस होण्याची इच्छा ठेवणाऱ्या १३ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्यानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago