ताज्याघडामोडी

हळद लागण्याआधीच मुलीसोबत भयंकर घडलं, लग्न घरात आक्रोश

तीन दिवसांवर तिचं लग्न होतं, पत्रिकाही वाटून झाल्या होत्या, बस्ता बांधून तयार होता, घर पाहुण्यांनी भरलं होतं, पण घरात लग्नाची लगबग सुरू असतानाच मुलीसोबत धक्कादायक घटना घडली. संभाजीनगरमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे हळहळ व्यक्त होत आहे. अंघोळीला गेलेल्या 18 वर्षांच्या भावीवधूचा पाणी घेताना हिटरचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.

लग्नघरात नवरदेवाची वरात येण्याऐवजी भावी नवरीची तिरडी उचलावी लागल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात वांगी खुर्द गावात हा प्रकार घडला आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरामध्ये शोककळा पसरली असून गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत. रोहिणी उर्फ पल्लवी भगवान जाधव, असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे.

26 मार्चला पल्लवीचं लग्न होतं, त्यामुळे ती आनंदी होती. लग्नाआधी शुक्रवारी तिची हळद होती, त्यामुळे आवरून लवकर तयार होण्यासाठी ती अंघोळीला बाथरूममध्ये गेली, पण गरम पाणी घेत असतानाच तिला हिटरचा शॉक बसला, यामध्ये पल्लवीला जीव गमवावा लागला आहे. हिटरमुळे मृत्यू होण्याच्या घटना मागच्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत, त्यामुळे हिटरच्या सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

3 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

6 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago