ताज्याघडामोडी

नोकरीच्या त्रासाला कंटाळला, अकाउंटंटने गिळले ५६ ब्लेड, रक्ताच्या उलट्या; रुग्णालयात डॉक्टरही हैराण

राजस्थानच्या जालोर जिल्ह्यात एका तरुणाने केलेल्या कृत्याने धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. हा तरुण एका सेठकडे कामाला होता. यादरम्यान या तरुणाने रागाच्या भरात ५६ ब्लेड गिळले. कागदाच्या आवरणासह ब्लेड खाताना त्याला सुरुवातीला काहीही त्रास जाणवला नाही. मात्र, तरी कागद निघाल्यानंतर त्याला त्रासाला सामोरे जावे लागले. वेदना वाढल्यानंतर त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या. यानंतर त्याला तातडीने सांचोर येथील मेडिपल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मेडीपल्स हॉस्पिटलचे डॉ. नरसीराम यांनी सांगितले की, सांचोरजवळील एका गावातील हा २६ वर्षीय तरुण आहे. त्याला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याचा एक्स-रे काढल्यानंतर त्याच्या शरीरात कापलेले ब्लेड दिसले. यानंतर डॉक्टरांच्या टीमने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. रविवारी सुमारे ३ तास ही शस्त्रक्रिया चालली.

ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांच्या पथकाने तरुणाच्या पोटातून ५६ ब्लेड काढले आहेत. सर्व ब्लेड दोन-दोन तुकड्यांमध्ये सापडले आहेत. शस्त्रक्रियेनंतर आता तरुणाची प्रकृती ठीक आहे. त्याच्या शरीराला आतून दुखापत झालेली आहे.

नरसीराम यांनी माहिती देताना सांगितले की, हा तरुण सांचोरजवळील गावातील आहे. तो शिकलेला असून एका बड्या उद्योजगाचा अकाउंटंट म्हणून काम करतो. शुक्रवारी त्याने कव्हरसह ब्लेड खाल्ले होते. एक ब्लेड दोन भागांमध्ये तोडून खाल्लं होतं, त्यामुळे खातेवेळी त्याला वेदना झाल्या नाहीत. परंतु पोटात कागद वितळल्यानंतर ब्लेडने आतमध्ये शरीराला इजा होऊ लागली. त्यामुळे त्यांच्या शरीरात गॅस तयार होऊन त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या

हे पाहून नातेवाईकांनी तरुणाला रुग्णालयात आणले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून ५६ ब्लेड बाहेर काढण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. त्याने हे ब्लेड का खाल्ले याबाबत तरुणाने अद्याप खुलासा केलेला नाही. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तरुण डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

3 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

6 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago