ताज्याघडामोडी

लहान बहीण घरी आली, दरवाजा ठोठावला, आतून कुणीही दरवाजा उघडेना; उघडताच पायाखालची जमीन सरकली

आई धुणीभांडी करण्याच्या कामासाठी, तर लहान बहीण शिकवणीसाठी घराबाहेर पडल्यानंतर घरात एकट्या असलेल्या मोठ्या मुलीने गळफास घेवून मृत्यूला कवटाळल्याची घटना शनिवारी सकाळी जळगाव शहरातील पिंप्राळा येथे उघडकीस आली आहे. प्रीती मंगेश जाधव (वय २०, रा. दिक्षा भूमी नगर, पिंप्राळा-हुडको) असे मयत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पिंप्राळा-हुडको भागातील दिक्षाभूमी नगर येथे प्रीती ही आई व लहान बहिणीसह वास्तव्यास होती. शनिवारी सकाळी प्रीतीची आई नेहमीप्रमाणे धुणी-भांडी करण्याच्या कामासाठी तर लहाण बहीण ही शिकवणीसाठी घराबाहेर पडली. त्यामुळे प्रीती ही घरात एकटी होती. यादरम्यान घरात एकट्या असलेल्या प्रितीने घरामध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली.

११ वाजण्याच्या सुमारास लहान बहीण ही शिकवणी सुटल्यावर घरी आली. तिने दरवाजा ठोठावला. पण, आतून कुणाकडूनही प्रतिसाद मिळत नसल्याने तिने शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर लहान बहिणीच्या पाया खालची जमीनच सरकली. तिला मोठी बहीण प्रीती हिचा ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला.

त्यानंतर तिने हंबरडा फोडला. काही वेळानंतर आईने घर गाठल्यावर मुलीचा मृतदेह पाहून तिनेही आक्रोश केला. ही घटना कळाल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. त्यानंतर पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. सर्व काही सुरळीत असतांना प्रीतीने केलेली आत्महत्या ही सर्वांच्या मनाला चटका लावून गेली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago