ताज्याघडामोडी

नशामुक्ती केंद्रात तरुणाला बेदम मारलं; एका हट्टानं जीव गेला; रातोरात गुपचूप अंत्यविधी, पण…

गुजरातच्या पाटणमधील एका खासगी नशामुक्ती केंद्रात तरुणाची हत्या झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. हार्दिक सुधार नावाच्या २५ वर्षीय तरुणाची नशामुक्ती केंद्रात १७ फेब्रुवारीला हत्या करण्यात आली. केंद्राच्या व्यवस्थापकासह इतर आरोपींनी तरुणाचा मृतदेह त्याच रात्री एका स्मशानात जाळला. यानंतर नशामुक्ती केंद्रानं तरुणाच्या काकांना फोन करून तरुणाचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचं सांगितलं. पोलीस उपायुक्त के. के. पांड्या यांनी हा घटनाक्रम सांगितला.

पोलिसांनी या संदर्भात गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जयोना नशामुक्ती केंद्र आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले. यावेळी त्यांना काही जण सुथारला निर्दयीपणे मारहाण करत असल्याचं आढळून आलं. त्यानंतर पोलिसांनी ८ मार्चला एफआयआर दाखल करून भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ आणि २०१ नुसार आठ जणांना अटक केल्याची माहिती पांड्या यांनी दिली.

नशामुक्ती केंद्रात असलेला सुथार ६ महिन्यांपासून घरी जाण्याचा हट्ट करत होता. त्यामुळे केंद्राचे व्यवस्थापक त्रासले होते, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानं दिली. ‘१७ फेब्रुवारीला सुथार स्नानगृहात गेला. तिथे त्यानं हाताची नस कापून घेतली. त्यामुळे व्यवस्थापक संदीप पटेल संतापले. सुथारला धडा शिकवण्यासाठी पटेल यांनी प्लास्टिकच्या पाईपनं त्याला मारहाण सुरू केली,’ असं स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक आर. के. अमीन यांनी सांगितलं.

कोणालाही शंका येऊ नये म्हणून आरोपी सुथारच्या काकांशी खोटं बोलले. रक्तदाब कमी झाल्यानं सुथारचा मृतदेह मृत्यू झाला. त्याच्यावर रात्री उशिरा स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याची खोटी माहिती नशामुक्ती केंद्राकडून सुथारच्या परिवाराला देण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

4 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

7 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

3 weeks ago