ताज्याघडामोडी

5 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे भेटले अन् आज ईडीने सदानंद कदमांना केली अटक!

दापोली रिसॉर्ट प्रकरणी अंमलबजाणी संचालनालय अर्थात ईडीने ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना अटक केली आहे. चार तासांच्या चौकशीनंतर कदम यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, 5 दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे खेडमध्ये सदानंद कदम यांना भेटले होते.

साई रिसॉर्ट प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आज सदानंद कदम यांची दुपारी साडे तीन वाजल्या पासून चौकशी सुरू होती. अखेर चार तासांच्या चौकशीनंतर कदम यांना अटक करण्यात आली आहे. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी पर्यावरण नियमांचं उल्लंघनआणि अवैध बांधकाम आणि इतर अनियमितततेच ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी मनी लाँड्रिंग झाल्याचा आरोप करत ED ने गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, सदानंद कदम यांच्यावरील या कारवाईनंतर ठाकरे गटानं ईडीवर जोरदार हल्लाबोल केला. रामदास कदमांचे भाऊ असलेले सदानंद कदम यांची ठाकरे गटासोबत जवळीक वाढली होती. 5 मार्चला खेडमधील सभेच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी सदानंद कदम यांची दोनदा भेट घेतली होती आणि त्यानंतर पाचच दिवसात ईडीनं कारवाई केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 day ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago