ताज्याघडामोडी

आई-मुलगी महिला दिनाच्या कार्यक्रमात गेल्या, मात्र घरी पोहोचल्याच नाहीत, वाटेतच….

आई आणि मुलगी दुचाकीने घरी जात असताना भरधाव कंटेनरने त्यांना धडक दिली. त्यात पंधरा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान आईचाही दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अकोला शहरातील नेहरू पार्क चौकात काल जागतिक महिला दिनाच्या रात्री म्हणजेच बुधवारी दहा वाजताच्या सुमारास घडली. संपदा तुपवणे असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे तर किरण तुपवने असं मृत आईचे नाव आहे.

आई किरण तुपवने (वय ४५) आणि मुलगी संपदा वय (१६) रा. पाटबंधारे कार्टर, अकोला या दोघी दुचाकीने ‘हॉटेल सेंटर प्लाझा’ येथील महिला दिनाच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. रात्री दहा वाजताच्या सुमारास घरी परतीच्या मार्गावर असताना नेहरू पार्क चौकातून वळण घेणार इतक्यात उड्डाण पुलावरून भरधाव आलेल्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीचा पूर्णतः चुराडा झाला असून मुलीचा (संपदा) जागीच मृत्यू झाला. तर आई (किरण) गंभीर जखमी झाली.

यावेळी जमावाने कंटेनर चालक मोहम्मद साबान मोहम्मद कासिम (रा. मधुबन, बिहार) याला चांगला चोप दिला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तसेच कंटेनर चालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. तर जखमी अवस्थेत असलेल्या किरण तुपवने यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झालाय.

दरम्यान नेहरू पार्क चौकात वाहनांची गर्दी होत असताना इथे एकही वाहतूक पोलिस नसतो. तसेच कंटेनर शहरात शिरला कसा? त्याला पोलिसांनी का अडवले नाही? असे एक ना अनेक प्रश्नांमुळे वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शंका निर्माण होत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

9 hours ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

4 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

7 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago