ताज्याघडामोडी

बारावीचा गणिताचा पेपर कसा फुटला, १२ हजारांना विक्री, पोलिसांनी डिलीट केलेला व्हॉट्सॲप ग्रूप शोधला

बारावीच्या पेपर फुटी प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. आतापर्यंतच्या तपासावरुन एका मोठ्या रॅकेटंतर्गत गणिताचा पेपर फोडण्यात आल्याचे दिसत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा पोलिस ठाणे हद्दीतील राजेगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय व भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राबाहेरून पेपर सुरू होण्याआधी अर्धा तास अगोदर गणिताच्या पेपरची दोन पाने व्हाटसअपवर व्हायरल झाली होती.

विशेष बाब म्हणजे, राजेगावप्रमाणेच मुंबईतील एका परीक्षा केंद्रावरूनदेखील बरोबर १० वाजून १७ मिनिटांनी हा पेपर एका व्हाटसअपग्रूपवर व्हायरल झाला होता. त्यामुळे राजेगाव येथील पेपरफुटीचे मुंबई कनेक्शन चव्हाट्यावर आले असून, एका विद्यार्थ्यांकडून १० ते १२ हजार रुपये घेऊन हा पेपर फोडण्यात आल्याचा संशय निर्माण झालेला आहे.

पेपरफुटीच्या रॅकेटच्या मुळाशी जाण्याचा निर्धार कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून ओळखले जाणारे डीवायएसपी यामावार यांनी केला आहे. त्यांच्या नेतृत्वात साखरखेर्डा पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात, या पेपरफुटीप्रकरणामध्ये पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन शिक्षकांनादेखील ताब्यात घेण्यात आलेले आहे. हे सर्वजण शेंदूरजन, बिबी, किनगावजट्टू, व भंडारी या गावातील आहेत.

राजेगाव येथील पेपरफुटीप्रकरणाचे राज्यस्तरीय धागेदोरे उघडकीस येण्याची शक्यता असून, हे एक मोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांना आहे. मुंबईतील दादर येथील डॉ. अ‍ॅण्टोनिओ डिसिल्वा हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील एका विद्यार्थ्याच्या मोबाईलमधून या पेपरचा काही भाग मुंबई पोलिसांनी जप्त केला आहे. त्यानंतर हे प्रकरण मुंबई पोलिसांनी गुन्हे शाखेकडे सोपविले आहे.

या पेपरफुटीचे धागेदोरे राजेगाव पेपरफुटी प्रकरणाशी असल्याचा संशय पोलिसांना आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० ते १२ हजार रुपये घेऊन पेपर फोडण्यात आल्याचा प्राथमिक संशय असून, याबाबत मुंबई गुन्हे शाखा व डीवायएसपी यामावार यांच्या नेतृत्वात साखरखेर्डा पोलिस कसून तपास करत आहेत. काही महत्वपूर्ण पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

24 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago