ताज्याघडामोडी

रविंद्र धंगेकरांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर मोठा आरोप

कसबा पोटनिवडणुकीतील राजकीय वातावरण अद्यापही तापलेले आहे.भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करत काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी कसबा गणपतीसमोर उपोषण सुरु केलं होतं. यावरुन आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी रविंद्र धंगेकरांवर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर रविंद्र धंगेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी पुण्यात पैसे वाटले आणि ज्या घरात पैसे वाटले ते घरं माझं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटलांवरही निवडणूक आयोगानं गुन्हा दाखल करावा. माझ्यावरचं अन्याय का? हा पक्षपातीपणा कशासाठी? आचारसंहिता लागू झाल्यानंतरही मुख्यमंत्री कसबा विधानसभेत फिरत होते? यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई का केली नाही? त्यामुळे निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे रविंद्र धंगेकर यांनी म्हंटले आहे.

मी उपोषण केले हे लोकशाही मार्गाने केले. कितीही गुन्हे दाखल केले तरी मागे हटणार नाही. मी कार्यकर्ता आहे मला विजयाचा विश्वास आहे. मी 15 ते 20 हजारांनी निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

5 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago