ताज्याघडामोडी

पाच वर्षाच्या चिमुरडीला सावत्र आईने संपवलं, फिट येऊन मृत्यूचा कांगावा, शहारे आणणारी घटना

आई मुलीच्या नात्याला काळिमा फासला असल्याची घटना घडली आहे. मुलगी त्रास देते म्हणून निर्दयी सावत्र आईने पाच वर्षाच्या मुलीचा चटके दिले. त्यानंतर कठीण वस्तू डोक्यात मारुन मुलीची हत्या केली. हा धक्कादायक प्रकार पुण्यातल्या उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे. हत्या केल्यानंतर मुलीला फिट आल्याचा बहाणा करून तीला डॉक्टरांकडे उपचारासाठी नेलं. परंतु वैद्यकीय तपासणीत मारहाण झाल्याचं लक्षात आलं. याची दखल घेत सावत्र आईला उत्तमनगर पोलिसांनी अटक केली.

श्वेता राजेश आनंद (वय ५, रा. उत्तमनगर, शिवणे) असं मृत मुलीचे नाव आहे. या प्रकरणी तीच्या ३६ वर्षीय आईवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्रतिका राजेश आनंद असं आरोपी आईचं नाव आहे. ही घटना गुरूवारी दिनांक २३ सकाळी नऊ ते दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत पोलीस हवालदार घोलप यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार श्वेताचे वडील एका खासगी कंपनीत लेबर म्हणून काम करतात. श्वेताच्या पहिल्या आईचा मृत्यू झाल्यावर त्यांनी हा दुसरा विवाह केला होता. त्यांच्या दुसर्‍या पत्नीस पहिल्या पतीपासून दोन मुले असून ते मिरज येथे शिक्षण घेतात. श्वेताच्या आईचा मृत्यू झाल्यापासून ती इतर कोणाकडे राहात नव्हती. आईची आठवण येत असल्याने ती सावत्र आईकडे देखील नीट राहात नव्हती. श्वेता सातत्याने त्रास देत असल्याने तीची सावत्र आई तीला सतत मारहाण करायची.

मात्र, मारहाण करुनही श्वेताचा त्रास बंद होत नसल्याने मागील दोन तीन दिवसांपासून तीने श्वेताला चटके देण्यास सुरवात केली. यानंतर गुरूवारी सकाळी तीने श्वेताच्या डोक्यात कठीण वस्तू मारुन तीची हत्या केली. श्वेता निपचीत पडल्यावर पतीला काय सांगायचे हा प्रश्न सावत्र आईपुढे उभा राहिला. यानंतर तीने श्वेताला जवळच्या डॉक्टरकडे नेत तीला फिट आल्याचे सांगितले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करता ती मृत झाल्याचे लक्षात आले आणि श्वेताच्या अंगावर चटके दिल्याचे डाग देखील होते.

प्रकार संशयास्पद असल्यामुळे रुग्णालयातून डॉक्टरांकडून पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर आरोपी आईला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुलगी सतत त्रास देत असल्याने तीला मारहाण करत हत्या केल्याची कबुली आरोपी आईने दिली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

6 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago