ताज्याघडामोडी

लग्नाच्या रिसेप्शनसाठी तयार व्हायला गेलेले नवरी-नवरदेव; काही वेळाने मृतावस्थेत आढळले, कारण हादरवणारं

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचा भाग असतो. मात्र लग्नानंतर तीन दिवसातच एका व्यक्तीने जे काही केलं ते जाणून तुम्हीही हादराल.घटना छत्तीसगडच्या रायपूरमधून समोर आली आहे. यात एकाच खोलीत नवरदेव आणि नवरीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. यात रिसेप्शन पार्टीसाठी तयार होण्यासाठी खोलीत गेलेल्या नवरदेवाने आधी आपल्या पत्नीची चाकूने भोसकून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही आत्महत्या केली. ही घटना रायपूरच्या टिकरापारा परिसरातील आहे.

रायपूरच्या टिकरापारा भागात एका खोलीत वधू-वरांचे मृतदेह सापडले आहेत. 19 फेब्रुवारीला दोघांचं लग्न झालं होतं, त्यानंतर दोघंही 21 फेब्रुवारीला रिसेप्शन पार्टीसाठी तयार होण्यासाठी रूममध्ये गेले. दरम्यान, दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला, त्यानंतर अस्लमने आपल्या कहकाशा बानोवर चाकूने वार केले.

दोघांनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तिथे दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोषी नगर नई बस्ती येथील रहिवासी असलमने 19 फेब्रुवारीला राजातालाब येथील रहिवासी कहकशा बानोसोबत लग्न केलं होतं. 21 फेब्रुवारीला दोघांचं लग्नाचं रिसेप्शन होतं.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

6 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago