ताज्याघडामोडी

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, शिवसेना नावासह धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला!

गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला पक्षचिन्हाचा वाद निवडणूक आयोगाने निकाली काढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे. धनुष्यबाण चिन्ह आपल्याला मिळावं यासाठी दोन्हीही गट गेली दोन महिने कागदोपत्री पुरावे सादर करण्यात व्यस्त होते. तीच कागदपत्रं पाहून निवडणूक आयोगानं शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह सुपूर्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

पुढच्या दोन ते तीन महिन्यांत राज्यात महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या अगोदर शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. पक्षचिन्हासोबतच शिवसेना नावदेखील एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले आहे. यापूर्वी निवडणूक आयोगानं हंगामी निर्णय देताना दोन्ही गटांना वेगवेगळे चिन्ह दिले होते. तसेच दोन्हीपैकी एकाही गटाला शिवसेना हे नाव दिले नव्हते.

शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव तर ठाकरेंच्या गटाला शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिले होते. मात्र अंतिम निर्णय देताना निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या पारड्यात आपला निर्णय टाकून त्यांना शिवसेना हे नाव दिले आहे.

शिवसेना पक्षाच्या घटनेत २०१८ मध्ये झालेला बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आलेला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बनवलेल्या १९९९ च्या पक्षाच्या घटनेत असलेले पक्षांतर्गत लोकशाही निकष बदलण्यात आले. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाच्या घटनेतील बदल निवडणूक आयोगाकडून संमत करुन घेतले होते. पण २०१८ मध्ये झालेले बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आले नाहीत, असं सांगून निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आजच्या युगात ‘आऊट ऑफ द बॉक्स’ पद्धतीने विचार करणे अनिवार्य – माजी संचालक डॉ. एन. बी. पासलकर स्वेरीमध्ये ‘ऑलम्पस २ के २४’ चा समारोप संपन्न

पंढरपूर- 'प्रत्येक विद्यार्थ्याला बाहेरच्या जगात नेमक्या काय घडामोडी सुरु आहेत याची माहिती असणे आवश्यक आहे. त्यांनी…

20 hours ago

आमदार आवताडेंनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत घेतली प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक

महिलांच्या अर्जातील त्रुटी दूर करून सर्व पात्र महिलांना लाभ देण्याच्या सूचना केंद्र व राज्य सरकारच्या…

1 day ago

राष्ट्रवादी कॉग्रेस (श.प.) पक्षाच्या अल्पसंख्यांक विभाग जिल्हा उपाध्यक्षपदी गुलाब मुलाणी यांची निवड  खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याहस्ते निवडीचे पत्र प्रदान

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभाग जिल्हा उपाध्यक्षपदी पंढरपुर तालुक्यातील कोर्टी येथील गुलाब मुलाणी यांची…

2 days ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर जिल्हा ओबीसी विभाग कार्यकारिणी बरखास्त

नवीन कार्यकारणीसाठी मुलाखत घेऊन निवडी करणार - अरुण तोडकर  राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर…

3 days ago

‘अभियंता दिना’ निमित्त स्वेरीत रक्तदान शिबीर संपन्न राष्ट्रीय सेवा योजनेचा उपक्रम

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर (ऑटोनॉमस) व सोलापूर विद्यापीठ संलग्नित असलेल्या…

4 days ago

अभियंत्यांचे जनक -सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील चिक्कबळ्ळापूर तालुक्यातील मुद्देनहळ्ळी या गावी १५ सप्टेंबर १८६०…

6 days ago