ताज्याघडामोडी

तिनं प्रपोज नाकारला, ‘ती’ आंघोळ करताना तरूण थेट घरी पोहोचला

सध्या फ्रेब्रुवारीचा महिना सुरु आहे. म्हणजेच प्रेमाचा महिना (व्हॅलेंटाइन डे). या महिन्यात मुलगा आपल्या आवडत्या मुलीजवळ आपलं प्रेम व्यक्त करत असतो. मात्र, कोण आपलं प्रेम कशाप्रकारे व्यक्त करेल याचा काही नेम नाही. अशीचं एक धक्कादायक आणि संतापजनक घटना अमरावतीमधील भातुकली तालुक्यात घडली आहे. घडलं असं की, मुलीने आपल्या प्रेमाचे प्रपोज नाकारल्यानंतर मुलाने ती पीडित मुलगी आंघोळ करत असताना धक्कादायक कृत्य केलं आहे.

पीडित मुलीने प्रपोज नाकाऱ्यानंतर संबंधित तरूणी आंघोळ करत असताना आरोपी तरूण चक्क तिच्या बाथरूममध्ये डोकावला. तिला तो दिसतात पीडित तरूणी जिवाच्या आकांताने ओरडली. त्यामुळे तिच्यावरील बाका प्रसंग टळला. या प्रकरणी नवल नामक (वय २१) या तरूणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवल हा तरुणीच्या ओळखीचा होता. दोन वर्षांपासून ती मैत्रीच्या नात्याने त्याच्यासोबत बोलायची. मात्र, त्याने त्यातून वेगळाच अर्थ घेऊन पंधरा दिवसांपूर्वी “मला तू आवडतेस”, असं सांगितलं. मात्र, तिच्या मनात त्याच्याविषयी काही नसल्याने तिने त्याला स्पष्ट नकार दिला. त्यानंतर पीडित तरूणीने त्याच्याशी बोलणं देखील बंद केलं.

मात्र, त्यानंतर तो सतत तिचा पाठलाग करून तिला त्रास देऊ लागला होता. त्यामुळे ती त्याला टाळू लागली होती. एवढचं नाहीतर कॉलेजला न जाता ती घरी राहत होती. मात्र, त्यानंतर एक विचित्र घटना घडली. सकाळच्या सुमारास पीडित तरूणी आंघोळ करत असताना आरोपी नवल हा अचानक बाथरूमच्या दरवाजा ढकलून आत डोकावला. त्याला अशा प्रकारे त्याला बघून ती घाबरली आणि जोराने ओरडली. त्यादरम्यान “प्लीज कॉल कर”, असं सांगून तो तेथून निघून गेला.

ही बाब पीडित तरुणीने आरोपीच्या भावाला सांगितली आणि तिने वलगाव पोलिस ठाणे गाठले. तेथे महिला पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून आरोपी नवलविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

12 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

7 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago