ताज्याघडामोडी

10 हजार कमावणाऱ्या सुरक्षा रक्षकाला आयकर विभागाने पाठवली 1 कोटींची नोटीस

आयकर भरणाऱ्या व्यक्तीला त्याच्या उत्पन्नानुसार आयकर भरावा लागतो. मात्र, कल्याणमधून एक विचित्र बातमी समोर आली आहे.येथे, हाऊस किपिंग आणि सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीला आयकर विभागाने चक्क 1 कोटी 14 लाख रुपयांचा आयकर भरण्याची नोटीस पाठवली आहे.चंद्रकांत वरक (56 वय) असे त्यांचे नाव आहे.

कल्याणमधील ठाणकरपाडा भागातील जैन चाळीत ५६ वर्षीय चंद्रकांत वरक आपल्या बहिणीसोबत राहतात.ते कधी घराचे रक्षण किंवा सुरक्षा रक्षक म्हणून तर कधी कुरिअर बॉय म्हणून काम करतात. 10,000 पगारावर ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.मात्र बुधवारी (1 फेब्रुवारी) त्यांना आयकर विभागाकडून 1 कोटी 14 लाख रुपये भरण्याची नोटीस मिळाली. त्यानंतर हा प्रकार चांगलाच चर्चेत आला आहे.

चंद्रकात वरक यांना विचाराले असता त्यांनी सांगितलं की, ही नोटीस मिळताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.त्यांनी आयुष्यात इतका पैसा फक्त टीव्हीवर पाहिला आहे. या प्रकरणी चंद्रकांत वरक यांनी आपली आयकर विभागाकडे तक्रार केली असता त्यांना आयकर विभागाच उत्तर ऐकूण आणखीनच आश्चर्याचा धक्का बसला. त्यांचा पॅनकार्ड क्रमांक वापरून परदेशात खरेदी केल्याचे त्यांना सांगण्यात आले. या सगळ्यापासून अनभिज्ञ असलेल्या चंद्रकांत वरक यांनी या प्रकरणाची योग्य चौकशी करण्याची मागणी केली आहे.

चौकशी केली असता, प्राप्तिकर विभागाने त्यांना सांगितले की त्यांचे पॅन कार्ड आणि कागदपत्रे वापरून चीनमधून वस्तू खरेदी करण्यात आल्या आहेत. त्या खरेदीवर कर भरलेला नाही. अधिकाऱ्यांनी त्याला पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले. आता चंद्रकांत वरक यांनी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करण्याचे धाडस दाखवले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

15 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

6 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago