ताज्याघडामोडी

थँक यु देवेंद्रजी ! पंढरपूरकरांचे  ६० वर्षाचे स्वप्न पूर्ण होणार आहे

पंढरपूर -फलटण रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार  ९२१ कोटीचा वाट उचलणार
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र,वारकरी सांप्रदायिक याला भूवैकुंठ म्हणत आले आहेत.खरे तर पंढरपूर हे तीर्थक्षेत्र ब्रॉडगेज रेल्वे मार्गाने जोडले जावे हे स्वर्गीय माजी आमदार तात्यासाहेब डिंगरे यांचे स्वप्न होते.१९९३ साली तत्कालीन राष्ट्रपती शंकरद्याल शर्मा हे विठ्ठलभक्त असल्याने नेहमी प्रमाणे पंढरपूरला आले आणि त्यांनी कुर्डुवाडी-मिरज ब्रॉडगेज मार्गासाठी शब्द दिला आणि तक्तालीन सरकारने तो अल्पावधीत पुरा देखील केला.
मात्र याच वेळी १९६० पासून पंढरपुर साठी आणखी एक रेल्वे मार्ग प्रलंबित होता तो म्हणजे पंढरपूर – लोणंद रेल्वे मार्ग.यासाठी प्राथमिक सर्वे देखील रेल्वेने केला होता.पण हा मार्ग पुढे कित्येक दशके रखडला.पंढरपुर-लोणंद रेल्वे मार्ग पुन्हा चर्चेत आला तो केंद्रातं मोदी सरकार आल्यानंतर.तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे अकलूज येथे स्वर्गीय माजी आमदार शंकरराव मोहिते पाटील यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यास उपस्थित राहिले आणि त्यावेळी त्यांनी पंढरपूर-लोणंद रेल्वे मार्गासाठी शब्द दिला.पण फारशी कार्यवाही होताना दिसून आली नाही.
याच दरम्यान पंढरपूरचे तत्कालीन आमदार स्व.भारत भालके यांनी रेल्वे मंत्र्यांस या रेल्वे मार्गासाठी पत्र लिहीत मागणी केली. त्यावेळी रेल्वे मंत्र्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या भागीरदारीत हा रेल्वे मार्ग करू राज्य शासनाने ५० टक्के वाटा उचलावा अशी मागणी केली.
पुढे २०१९ ला लोकसभा निवडणूक झाली आणि खा.रणजितसिह निंबाळकर हे माढा लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करू लागले.त्यांनी पाठपुरावा करून लोणंद -फलटण रेल्वे मार्गाचे कामही मार्गी लावले.पण त्यांचे स्वप्न होते ते पुढे हा रेल्वे मार्ग पंढरपूर पर्यंत नेण्याचे.त्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता.याच काळात राज्यात महाविकास आघाडी सत्तेत होती.त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांच्या संयुक्त उपक्रमास फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
जुलै मध्ये राज्यात सत्तांतर झाले.आणि खा.निंबाळकर यांनी पुन्हा यासाठी पाठपुरावा सूरु केला.२ म्हन्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस हे मंगळवेढा तालुक्यात आवताडे शुगर्सच्या कार्यक्रमासाठी आले.त्या ठिकाणी भाषणात शब्द दिला पंढरपूर -फलटण रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार आपला वाटा उचलेल आणि आज 921 कोटी रुपये राज्य सरकार यासाठी निधी देईल असा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेत आपला शब्द खरा केला.
त्यामुळे पंढरपूर रेल्वे स्थानक हे जंक्शन म्हणून ओळखले जाणार आहे दक्षिण भारत आणि उत्तर भारत याना जोडणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या या मार्गावरून भविष्यात धावू शकतात.
पंढरपूर -विजापूर रेल्वे मार्गासाठी २०१३ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी निधी दिला जाईल अशी घोषणा केली होती.पण ते होऊ शकले नाही.सर्व्हे सुरु झाला पण मध्येच थांबवला गेला.आता आमदार समाधान आवताडे याच रेल्वे मार्गासाठी पुन्हा पाठपुरावा करीत आहेत.त्या बाबत देखील लवकरच निणर्य होईल अशी अपेक्षा करूयात.
त्यामुळेच म्हणावे वाटते थँक यु देवेंद्रजी,एकीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंढरपूरला जोडणारे सारे रस्ते राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर विकसित केले.आता तुम्ही पंढरपूर-फलटण रेल्वे मार्गासाठी ९११ कोटी रुपये निधी देण्याचा शब्द खरा केला.
एक सामान्य पंढरपूरकर म्हणून आम्ही आपले आभारी आहोत !
– राजकुमार शहापूरकर
(संपादक -पंढरी वार्ता न्यूज नेटवर्क )

⚡⚡चष्मा आणि सनग्लास आता
बजाज फायनान्सवरती 0 डाऊन पेमेंट ,
0 % व्याज दरात उपलब्ध⚡⚡⚡
RAYBAN,STEPPER,VOUGE,
MAUI JIM SUNGLASS AVAILABLE

👓मोफत नेत्र तपासणी👓
👓चष्म्यासाठी मोफत इन्शुरन्स👓

आजच भेट द्या
टायटन वर्ल्ड | टायटन आय +
एस टी स्टॅन्ड जवळ ,भोपळे रोड ,सांगोला
संपर्क – 7507 995 995

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

3 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

7 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago