ताज्याघडामोडी

सावकाराच्या जाचाला कंटाळून वडिलांसह दोन मुलांनी घेतला गळफास

सातपूर परिसरातील राधाकृष्ण नगर येथील फळ व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील तीन पुरुषांनी एकाच वेळी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब घडली आहे. वडिलांसह दोन्ही तरुण मुलांनी घरातील तीन खोलींमध्ये गळफास घेत जीवन संपले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या बाबत सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरोडे कुटुंब मूळचे देवळा तालुक्यातील उमराणे येथील रहिवाशी आहे. दहा वर्षांपूर्वी ते व्यवसाय निमित्ताने नाशिकच्या सातपूर राधाकृष्ण नगर परिसरात राहिला आले होते. कुटुंबतील वडील दीपक शिरोडे ( वय 55) हे अशोक नगर बस स्टॉप जवळ फळविक्रीचा व्यवसाय करत असत. तर, त्यांचे मुले प्रसाद शिरोडे (वय 25) राकेशे शिरोडे (वय 23) हे चारचाकी वाहनांवर फळ विक्रीचा व्यवसाय करायचे. आज दुपारच्या सुमारास दीपक शिरोडे यांच्या पत्नी काही कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या, ही संधी साधून वडिलांसह दोन्ही मुलांनी आत्महत्या केली. 

त्यांनी घरातील तीन वेगवेगळ्या खोलींमध्ये पंख्याला गळफास घेत आपले जीवन संपवले. थोड्या वेळाने आई घरी आली असता कोणीही दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्यांनी परिसरातील नागरिकांना मदतीची विनंती केली. त्यानंतर दरवाजा तोडून आत प्रवेश करण्यात आला. तेव्हा वडिलासह दोन मुलांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. पतीसह दोन्ही मुलांनी गळफास घेतल्याचे दिसल्या पत्नीने एकच आक्रोश केला.

एकच घरातली तीन लोकांनी आत्महत्या केली आहे. या घटनेची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. तसेच त्यांच्या घरातून एक रजिस्टर मिळून आले आहे. त्यात नोट सापडली आहे. त्यात सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे म्हटले आहे, या सावकारांवर आम्ही कायदेशीर कारवाई करू, असे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार शिरोडे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खराब झाली होती. त्यामुळे हे कुटुंब गेल्या अनेक दिवसापासून नैराश्यात होते. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा परिसरात आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

5 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago