ताज्याघडामोडी

बापाने पोटच्या मुला-मुलीला विष पाजलं; स्वत:ही जीवन संपवलं

फिरायला जातो सांगत पडला होता घराच्या बाहेर

औरंगाबाद : शहरातील कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराने आपल्या दोन मुलांना विष पाजून स्वत:ही विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सदर व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन्ही मुलांवर औरंगाबदमध्ये उपचार सुरू आहेत. भागवत पंजाजी काळे (वय-३४) असं विष पिऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भागवत काळे हे शहरातील एका कंपनीत काम करतात. बाहेर फिरायला जातो, असं सांगून ते घरातून निघाले. मात्र नंतर ते दोन्ही मुलांना घेऊन अंबड रस्त्यावर आले आणि तिथे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना विष पाजलं. भक्ती आणि वेद अशी उपचार सुरू असलेल्या जुळ्या चिमुकल्यांची नावे आहेत.या प्रकरणी नातेवाईक आणि पोलिसाकडूनच मिळालेली अधिक माहिती अशी की, काळे हे सुमारे दहा वर्षांपासून वाळूज औद्योगिक नगरीतील रांजणगाव भागात रोजगार निमित्ताने राहत होते. दोन्ही मुलांना घेऊन फिरून येतो असे सांगून ते घराबाहेर गेले. बऱ्याच वेळानंतर काळे यांनी त्यांच्या मावस भावाला कॉल करून जालना-अंबड रस्त्यावर दोन्ही मुलांना विष पाजून मी स्वतः विष प्राशन केल्याची माहिती दिली.

भागवत काळे यांच्या मावस भावाने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन काळे व दोन्ही मुलांना जालना येथे रुग्णालयात हलवले. तेथे प्राथमिक उपचार करून तिघांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना काळे यांचं मृत्यू झाला तर दोन्ही मुलांवर उपचार सुरू आहे.

जन्मदात्या बापानेच आपल्या मुलांना विष पाजून स्वत: आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र भागवत काळे यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

⚡️Republic Day Offer⚡️🇮🇳🇮🇳️
टायटन घड्याळांवर 40% पर्यंत सूट
स्मार्ट वॉच फक्त 2495/-
👓TITAN , Fastrack
फ्रेम आणि गॉगलवर 50 % पर्यंत सूट*⭐ बजाज फायनान्स / क्रेडिट कार्डवर 1 मिनिटात EMI
👉3/6/9/12 महिने EMI *आजच भेट द्या
टायटन वर्ल्ड | टायटन आय +
एस टी स्टॅन्ड जवळ ,भोपळे रोड ,सांगोला
संपर्क -7507 995 995

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

23 hours ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

4 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago