ताज्याघडामोडी

जिल्हा स्तरीय चित्रकला स्पर्धेत” कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर चा ‘कृष्णा मकर’ पहिला

पंढपूर: येथील कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशालेच्या चि.कृष्णा अमर मकर इ. ९वी या विद्यार्थ्यांने झपूर्झा व पु. ना. गाडगीळ यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या जिल्हास्तरीय स्पर्ध्येमध्ये पंढरपूरातील इतर शाळेचे जवळपास १०० विद्यार्थी सहभागी झालेले होते या सर्वामधून कृष्णा मकर याने ८वी व ९वी गटातून प्रथम क्रमांक मिळवून पु. ना. गाडगीळ यांच्या कडून ५० ग्रॅम चांदीचे पदक प्राप्त केले.

चि.कृष्णा मकर याचे अभिनंदन संस्थेचे प्रमुख विश्वस्त मा. श्री. रोहनजी परिचारक यांनी करून त्यास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशालेच्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांच्या हस्ते कृष्णाला पदक व प्रशस्तिपत्रक प्रदान करून त्याचा सन्मान केला.
यावेळी प्रशालेचे चित्रकला शिक्षक श्री. नारायण कुलकर्णी व वृषाली काळे यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यास लाभले. याप्रसंगी कृष्णाचे अभिनंदन प्रशालेच्या सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

21 hours ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

4 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago