ताज्याघडामोडी

चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीसह अडीच वर्षाच्या मुलीची हत्या

औरंगाबाद शहर दुहेरी हत्याकांडाने हादरले आहे. चारित्र्याच्या संशयावरून एकाने आपल्या पत्नीसह अडीच वर्षांच्या मुलीची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केली आहे.घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

समीर विष्णु म्हस्के असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव असून, पत्नीचे आरती समीर मस्के तर मुलीचे निशात समीर मस्के नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, औरंगाबादच्या सातारा पोलीस ठाणे हद्दीतील कांचनवाडी परिसरात समीर मस्के हा आपल्या पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलीसह राहत होता. मात्र आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर तो नेहमी संशय घेत होता. यावरून अनेकदा त्यांच्यात वाद देखील होत होता. दरम्यान काल रात्री पुन्हा यावरून वाद झाला. त्यानंतर समीर मस्के यांनी घरातील नायलॉनच्या दोरी आणि मोबाईल चार्जरच्या वायरने पत्नी आरती आणि मुलगी निशात यांची गळा आवळून हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

औरंगाबादच्या सातारा पोलीस ठाणे हद्दीतील कांचनवाडी परिसरात पतीने आपल्या पत्नीची आणि मुलीची हत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर आरोपी समीर मस्के याला सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी समीरच्या आईवर देखील गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचे समोर आले आहे. तर आईनेच आपल्या मुलाला हत्या करण्यासाठी सांगितले असल्याचे आरोप आरतीच्या माहेरच्या लोकांनी केला आहे.

आरती मस्के यांच्या नातेवाईक संतोष सदाशिव सुतार यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, समीर याने आपली आई सुनिता विष्णु म्हस्के यांच्या सांगण्यावर आपल्या पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेऊन तिची हत्या केली आहे. समीरने आधी पत्नी आरतीच्या तोंडात कापडी बोळा कोंबला. त्यानंतर आरतीचा व निशांतचा नायलॉनच्या दोरीने व वायरने गळा आवळून हत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी समीर विष्णु म्हस्के आणि त्याची आई सुनिता विष्णु म्हस्के यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

6 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago