ताज्याघडामोडी

पतीने पत्नीला चालत्या रिक्षातून ढकलून दिले, पुढे केले ते आणखी धक्कादाक; कारण वाचून येईल संताप

नशा करण्यासाठी पत्नीने पैसे दिले नाहीत म्हणून रिक्षाचालक पतीने आपल्याच पत्नीला चालू रिक्षातून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पती एवढ्यावरच न थांबता त्याने पत्नीला रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी घरी आणले आणि तिला रॉडच्या सहाय्याने पुन्हा दोन वेळा मारहाण केली. सध्या महिलेच्या डोक्याला, हाताला, पायाला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठाण्यातील वागळे इस्टेट इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या कृष्णानंद सिंग उर्फ हॅप्पी या रिक्षाचालकाने आपल्या पत्नीकडे नशा करण्यासाठी पैशाची मागणी केली. महिलेने आपला पगार झाला नसल्याचे पतीला सांगितले. एवढे ऐकून नशेखोर पतीने पत्नी काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि फरफटत बाहेर काढले. पत्नीला जबरदस्ती रिक्षात बसवून पती रागात तेथून निघाला आणि पुढे हायवेला आल्यानंतर त्याने आपल्याच पत्नीला चालत्या रिक्षातून ढकलून दिले. यात महिला जखमी झाली.

जखमी झालेल्या आपल्या पत्नीला या कृष्णानंदने रुग्णालयात न घेऊन जाता घरी आणले आणि लोखंडी सळईच्या सहाय्याने बेदम मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार १७ डिसेंबर रोजी घडला. यात पत्नी जखमी झाल्यानंतर तिला सासरच्या लोकांनी कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात बसमधून पडून जखमी झाल्याचा बहाणा सांगत उपचारासाठी भरती केले. दुसऱ्या दिवशी कृष्णानंद याने आपल्या पत्नीला पुन्हा रुग्णालयातून घरी आणले आणि पुन्हा तिला लोखंडी सळईच्या सहाय्याने बेदम मारहाण केली. पत्नीला वेदना असहाय्य झाल्याने तिने शौचालयाचा बहाणा करून जखमी अवस्थेत पळ काढला आणि आपल्या बहिणीला भेटून आपबिती संपूर्ण घटना सांगितली आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

बहिणीला हा संपूर्ण प्रकार कळल्यानंतर बहिणीने पीडितेला ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती केले आहे. तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. ८ वर्षांपूर्वी पीडित महिलेचे रिक्षाचालक कृष्णानंद सिंग याच्यासोबत लग्न झाले होते. त्यांना एक लहान मुलगा देखील आहे. मात्र कृष्णानंद हा सुरुवातीपासूनच नशेच्या आहारी गेला आहे. लग्न झाल्यापासून म्हणजेच गेल्या ८ वर्षांपासून नशेसाठी आपल्या पीडितेला तिचा पती अशाच प्रकारे मारहाण करून मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचे पीडितेच्या बहिणीने सांगितले आहे. तसेच आता देखील तो रुग्णालयात येऊन या महिलेला मारहाण करणार असल्याची धमकी देत असल्याचे देखील पीडितेच्या महिलेने सांगितले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

4 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

1 week ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

3 weeks ago