ताज्याघडामोडी

विद्यार्थिनीला स्टोअर रूममध्ये टाचणी आणण्यासाठी पाठवले

पाठीमागून जात शिक्षकाने केला विनयभंग 

अमरावती जिल्ह्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ होताना दिसत आहे. अशातच एका शिक्षकाने विद्यार्थिनीला स्टोअर रूममध्ये टाचणी आणण्यासाठी पाठवले आणि एकांताचा फायदा घेत त्या मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. दरम्यान मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या शिक्षकाला न्यायालयासमोर हजर केल्याची माहिती समोर आली आहे. तेरा वर्षीय विद्यार्थिनीसोबत असभ्य वर्तन केल्याच्या आरोपामुळे एका शिक्षकाविरुध्द सोमवारी रात्री विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित शिक्षकाला जिल्हा परिषद सीईओंच्या आदेशाने निलंबित करण्यात आले.

प्रशांत चक्रधर सोनार (४२) असे निलंबित झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. धारणी तालुक्यातील एका शाळेत शिक्षक असलेल्या सोनार यांनी सोमवारी सकाळी एका १३ वर्षीय विद्यार्थिनीला टाचणी आणण्यासाठी पाठवले. शिक्षकांनी सांगितल्यामुळे विद्यार्थिनी टाचणी आणायला गेली असता शिक्षक सोनार विद्यार्थिनीच्या मागे गेला. त्याने आपल्यासोबत असभ्य वर्तन केले, अशी तक्रार पीडित विद्यार्थिनीने धारणी पोलिसांत दिली. या वरून पोलिसांनी शिक्षकाविरुध्द तात्काळ विनयभंग तसेच पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

1 day ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

5 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago