ताज्याघडामोडी

महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग धोरण ठरविण्याच्या समितीमध्ये तज्ञ सदस्यपदी आ आवताडे यांची निवड

लक्ष्मीदहिवडी/प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्याचे प्रस्तावित वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 28 साठी शासनाकडून समिती गठीत करण्यात आली असून या समितीमध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांची निवड झाली आहे राज्याच्या आर्थिक संरचनेमध्ये वस्त्रोद्योग क्षेत्राची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे शेती व्यवसायानंतर वस्त्रोद्योग हा राज्यातील महत्त्वाचा उद्योग आहे कृषी व्यवसायानंतर या उद्योगांमध्ये जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग धोरण 2018 ते 23 हे दिनांक 15 2 2018 रोजी जाहीर केले होते वस्त्रोद्योग धोरण 2018 ते 23 मध्ये वस्त्रोद्योगाच्या वाढीसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या तथापि सदर धोरण हे 31 मार्च 2023 रोजी संपुष्टात येणार आहे त्यामुळे नवीन वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 28 जाहीर होणार आहे सदर धोरण जाहीर करण्यासाठी सध्या राज्यातील वस्त्रोद्योगाच्या गरजा तसेच वस्तूस्थिती यानुसार नवीन वस्त्रोद्योग धोरण तयार करण्यासाठी संबंधित उद्योगाची तज्ञ व त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींची सल्लामसलत करून हे धोरण तयार होणार आहे यासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांचे सूतगिरणी यंत्रमाग हातमाग तज्ञ

सदस्य म्हणून या समितीमध्ये निवड झाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने या गठीत केलेल्या समितीने 2018 ते 23 च्या वस्त्रउद्योग धोरणाचा आढावा घेऊन राज्यातील कापूस उत्पादन व वापर, मागील धोरणातून झालेली फलनिष्पत्ती, वस्त्रोद्योगाच्या नवीन संधी, महाराष्ट्र व शेजारील राज्याचे वस्त्रोद्योग धोरणे, केंद्राचे वस्त्रोद्योग धोरण, महाराष्ट्राचे व शेजारील राज्यांचे विजेचे दर व त्यांच्या वस्त्रोद्योगाच्या व्यवहार्यतेवर होणारा परिणाम, सहकारी सूतगिरण्या कशाप्रकारे तोट्यातून बाहेर काढता येतील व स्वयंपूर्ण बनवता येतील, रेशीम शेती मोठ्या प्रमाणात राज्यात राबवणे, रेशीम उद्योगाची प्रक्रिया केंद्राची उभारणी, सध्या यंत्र मागाचे आधुनिकीकरण करण्यासाठी प्रोत्साहन, पर्यावरण पूरक प्रोसिसिंग प्रकल्प, वस्त्रोद्योगाच्या विकासात शेतकऱ्यांना थेट फायदा कसा मिळेल या सर्व बाबीवर या समितीने अभ्यास करून दोन महिन्याचा आत अहवाल सादर करावयाचा असून त्यांचा आराखड्यानुसार पुढील पाच वर्षाचे वस्त्रोद्योग धोरण तयार होणार आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

6 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago