ताज्याघडामोडी

ग्रामीण भागाच्या विकासासाठीच्या नवकल्पना व उद्योजकतेला गती देणे’ या विषयावर स्वेरीत दि.४ व ५ नोव्हेंबर रोजी संमेलन

जागतिक पातळीवरील तज्ञ उपस्थित राहून करणार मार्गदर्शन 

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये येत्या  दि.४ व ५ नोव्हेंबर, २०२२ रोजी स्वेरीज सोबस सेंटर ऑफ एक्सलंस, सोबस, बेंगलोर आणि व्हील्स ग्लोबल फौंडेशन, अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने  ‘अॅसलरेटींग रुरल इनोव्हेशन अँड सोशल एन्टरप्रेनरशिप (ग्रामीण भागाच्या विकासासाठीच्या नवकल्पना व उद्योजकतेला गती देणे) या विषयावरील संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या चर्चासत्रात जागतिक पातळीवरील तंत्रज्ञानातील व उद्योग विश्वातील तज्ञ मंडळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
             ग्रामीण नवकल्पनांना चालना देणे व त्याद्वारे ग्रामीण उद्योजकता विकासास गती देण्याच्या दृष्टीकोनातून स्वेरी मध्ये सोबस सेंटर ऑफ एक्सलंस ची स्थापना करण्यात आली आणि त्याद्वारे ग्रामीण विकासासाठीचे नवनवीन उपक्रम राबवले जातात. अशाच उपक्रमांचा एक भाग म्हणून दि. ४ व ५ नोव्हेंबर २०२२ या दोन दिवस होणाऱ्या या  संमेलनात स्थानिक नवकल्पनांचे प्रदर्शन आणि मार्गदर्शनपर सत्रे आणि दुसऱ्या दिवशी जागतिक पातळीवरील प्रख्यात मान्यवरांची चर्चा यांचा समावेश असेल. व्हील्स ग्लोबल फाउंडेशन, अमेरिका ही जागतिक पातळीवरील एक प्रख्यात संस्था आहे जी भारतातील आय.आय.टी च्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेली आहे. हि संस्था जल व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, ऊर्जा संवर्धन आणि शाश्वत विकास या सर्व बाबतीत जागतिक पातळीवर कार्य करते.  पंढरपूरच्या स्वेरीज सोबस सेंटर ऑफ एक्सलन्सच्या  निधी आणि ज्ञान या बाबतीत ही संस्था भागीदार आहे. उद्योजकता आणि नवोपक्रमाशी संबंधित ऑन-ग्राउंड कामाची अनुभूती घेणे आणि विविध भागधारकांना भेटून सल्ला मसलत करणे  हा या भेटीचा मुख्य हेतू आहे. या कार्यक्रमासाठी व्हील्स ग्लोबल फाउंडेशन (युएसए)चे अध्यक्ष सुरेश शेणॉय, मास्टेक चे संस्थापक चेअरमन आणि  व्हील्स ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष अशांक देसाई, सोबस इनसाइट फोरम, बेंगलोर चे व्यवस्थापकीय संचालक दिग्विजय चौधरी यांच्यासोबत व्हील्स ग्लोबल फाउंडेशनचे १० पेक्षा अधिक मान्यवर उपस्थित असणार आहेत. या भेटी दरम्यान दोन्ही दिवस विविध उपक्रम असणार आहेत. या संमेलनामध्ये स्वेरीचे विद्यार्थी त्यांच्या नवनवीन प्रकल्पांचे सादरीकरण करणार आहेत. त्याचबरोबर स्थानिक नवउद्योजकही या संमेलनात सहभागी होऊन आपल्या उद्योगाच्या स्थापनेबद्दल मनोगत व्यक्त करणार आहेत.  स्वेरी कॅम्पसमध्ये या उपक्रमासाठी जय्यत तयारी सुरु असून सर्व सहभागी नवउद्योजकांना बौद्धिक मेजवानीही  मिळणार आहे. सोबसच्या संचालक रेषा पटेल, गिरीष संपत, आकांक्षा सिन्हा, ईशान पंत तसेच स्वेरीतील शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. आर. आर. गिड्डे, डॉ. प्रवीण ढवळे यांच्यासह  इतर प्राध्यापक वर्ग परिश्रम घेत आहेत.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

5 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago