ताज्याघडामोडी

दांडिया खेळायला गेला, किरकोळ भांडणातून जीवच गमावून बसला

नाशिकमध्ये दांडिया खेळायला गेलेल्या एका तरुणाची हत्या करण्यात आली.त्यामुळे एकच खळबळ उडालीय. दांडिया खेळताना किरकोळ वाद होऊन बाचाबाची झाली. त्यानंतर शिवीगाळ होऊन अखेर तरुणाला धारदार शस्त्राने भोसकण्यात आलं होतं. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाची मृत्यूशी झुंज सुरु होती. पण अखेर ही झुंज अपयशी ठरली असून तरुणाने जीव गमावलाय. यानंतर हत्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी चार जणांना अटक केलीय. पुढील तपास केला जातोय.

नाशिक शहराच्या उपनगर परिसरात नवरात्रोत्सवादरम्यान खळबळजनक घटना घडली. दांडिया खेळत असताना झालेल्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. चक्क चाकूने या तरुणाला भोसकण्यात आलं. यात तरुण गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाला होता.

बाबू लोट असं जखमी तरुणाचं नाव आहे. त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं. पण अखेर त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सगळेच हादरुन गेले आहेत. किरकोळ वादातून बाबू लोट या तरुणाचा दांडिया खेळताना काही तरुणांची वाद झाला होता.

किरोकोळ कारणातून झालेल्या वादातून बाबू लोट आणि अन्य चार ते पाच जणांमध्ये भांडण झालं. त्याचं रुपांतर नंतर शिवीगाळ आणि हाणामारीत झालं. पण हा राडा पुढे इतका वाढला, की संतप्त तरुणांनी बाबूला चाकूने भोसकलं. यात बाबू लोट गंभीर जखमी होऊन अखेर त्याचा मृत्यू झालाय.

या घटनेची नाशिकच्या उपनगर पोलिसांनी गंभीर दखल घेतलीय. चौघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या संशयित आरोपींमध्ये तिघे अल्पवयीन असल्याची माहिती समोर आलीय. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या ताब्यात घेण्यात आलेल्या सगळ्यांची पोलीस कसून चौकशी करत आहेत. हत्या झालेल्या तरुणासोबत नेमकं कोणत्या कारणावरुन भांडण झालं होतं, याचा तपास पोलिसांकडून केला जातोय.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 day ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago